हेमंत लागवणकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अत्यंत तीव्र किरणोत्सारी आणि तितकंच अस्थिर असल्याने अ‍ॅस्टेटाइन हे मूलद्रव्य स्वरूपात अजून कोणीही पाहिलेलं नसल्यामुळे साहजिकच, आपल्या मनात प्रश्न येतो की मग या मूलद्रव्याचा शोध कसा लावला गेला?

१८६९ साली रशियन रसायनशास्त्रज्ञ दिमित्री मेंडेलिव्हने या मूलद्रव्याच्या अस्तित्वाविषयी पहिल्यांदा अंदाज बांधला. मेंडेलिव्हने प्रसिद्ध केलेल्या आवर्तसारणीमध्ये आयोडिनच्या खालची जागा या मूलद्रव्यासाठी रिकामी ठेवली होती. न शोधलेल्या पण अस्तित्वाची खात्री असलेल्या या मूलद्रव्याचं नाव ‘इका-आयोडिन’ असं ठेवण्यात आलं.

त्यानंतर अनेक संशोधकांनी या इका-आयोडिनचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; पण त्यातले अनेक प्रयत्न चुकीचे असल्याचंही सिद्ध झालं. १९३१ साली फ्रेड अ‍ॅलिसन याने पहिल्यांदा हे मूलद्रव्य शोधल्याचा दावा केला आणि अलाबामा पॉलिटेक्निक इन्स्टिटय़ूटमध्ये शोधलं गेल्याने त्याचं नामकरण ‘अ‍ॅलाबॅमाइन’ असं केलं. पण १९३४ साली फ्रेड अ‍ॅलिसन याने केलेलं संशोधन चुकीचं असल्याचं सिद्ध झालं.

त्यानंतर १९३७ साली डाक्का इथे (आताचे बांगलादेशातले ढाका) राजेन्द्रलाल डे यांनी थोरिअमच्या किरणोत्सारी शृंखला प्रक्रियेतून नवीन मूलद्रव्य शोधल्याचा दावा केला. या मूलद्रव्याला त्यांनी ‘डाकिन’ असं नाव दिलं. पण थोरिअमच्या किरणोत्सारी शृंखला प्रक्रियेमध्ये अ‍ॅस्टेटाइनचं अस्तित्व न सापडल्याने राजेन्द्रलाल डे यांचा दावा चुकीचा ठरवण्यात आला.

१९३८ साली पॅरिस इथे होरिया हुलुबेई आणि व्येटर कौचोइस (फ्रेंच उच्चार : इवेट् कुष्वॉ) यांनी क्ष-किरण वर्णपंक्तीमध्ये नवीन मूलद्रव्याशी संबंधित तीन रेषा शोधल्याचा दावा केला. पण दुसऱ्या महायुद्धाच्या धामधुमीत या संशोधनाकडे कुणी लक्ष दिलं नाही आणि हे संशोधन मागे पडलं.

त्याच सुमारास म्हणजे १९४० साली डेल कॅसन, केनेथ रॉस मॅकेन्झी आणि एमिलिओ सेग्रे यांनी कॅलिफोíनया विद्यापीठात बिस्मथ-२०९ वर अल्फा कणांचा मारा करून अ‍ॅस्टेटाइन-२११ आणि दोन न्युट्रॉन मिळवण्यात यश आलं. कृत्रिमरीत्या मिळालेल्या आणि प्रत्यक्षात न पाहिलेल्या या नव्या मूलद्रव्याचं नामकरण त्यावेळी केलं गेलं नाही. १९४३ साली बेर्टा काíलक आणि ट्राउडे बन्रेर्ट यांना किरणोत्सारी शृंखला प्रक्रियेतून अ‍ॅस्टेटाइन सापडलं. अणुक्रमांक ८५ असलेल्या या मूलद्रव्यावर शिक्कामोर्तब झालं. ‘अत्यंत अस्थिर’ असा अर्थ असलेल्या ग्रीक शब्दावरून या मूलद्रव्याचं नामकरण १९४७ साली ‘अ‍ॅस्टेटाइन’ असं करण्यात आलं.

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org