आपल्या जीवनातून साखर काढून टाकली तर? असा विचार करून पाहा. सर्व जीवनच नीरस, अगोड वाटायला लागेल. शिवाय हेही महत्त्वाचं आहे की, सर्व सजीवांना कबरेदकांपासून ऊर्जा मिळते आणि त्यात साखरेची भूमिका महत्त्वाची आहे.
आपण घरात जी साखर वापरतो, ती म्हणजे सुक्रोज. पाण्यात विरघळणाऱ्या कबरेदकांना शर्करा म्हणतात. सुक्रोज ही शर्करा आहे. आपल्याकडे मुख्यत: ऊसापासून साखर तयार केली जाते. तसं पाहायला गेलं तर सर्व वनस्पतींत साखर कमी-अधिक प्रमाणात असते, परंतु ऊस आणि बीट या वनस्पतींत साखरेचं प्रमाण जास्त असल्यानं या वनस्पतींतून साखर मिळवणं जास्त फायदेशीर आहे.
ऊस तोडल्यावर लगेच त्यावर प्रक्रिया सुरू करावी लागते, नाही तर त्यातील सुक्रोजचे रेणू तुटायला लागतात. त्यामुळे ऊस साठवून ठेवता येत नाही. उसाच्या रसावर अनेक प्रक्रिया करून स्फटिक रूपात साखर मिळवितात. साखर जेव्हा उसात असते, तेव्हा सुक्रोजबरोबर त्यात मॅग्नेशिअम, कॅल्शियम आणि फॉस्फरस हे महत्त्वाचे घटक असतात. ऊस पिळून रस काढल्यानंतरही हे घटक त्यात शाबूत असतात. जेव्हा त्यांचं शुद्धीकरण करून स्फटिकीकरण केलं जातं, त्या वेळेस हे घटक नाश पावतात.
आपल्या शरीरात सुक्रोजचं पचन आणि सात्मीकरण(अॅसिमिलेशन) सहजपणे होतं. पण सुक्रोजच्या पचनासाठी मॅग्नेशिअम, कॅल्शियम आणि फॉस्फरस हे घटक आवश्यक असतात. साखरेबरोबर हे घटक नसतील तर शरीरातील इतर भागांतून हे क्षार घेतले जातात आणि त्याचा वाईट परिणाम शरीरावर होऊ शकतो. त्यामुळे स्फटिकीकरण केलेल्या साखरेचे पदार्थ खाताना जरा जपूनच खावेत.
आपल्या शरीरात ग्लुकोजच्या स्वरूपात साखर असते आणि आवश्यकतेनुसार शरीराला ऊर्जा पुरवली जाते. एक ग्रॅम सुक्रोजपासून ३.९४ कॅलरी ऊर्जा मिळते. घरगुती आणि औद्योगिक खाद्यपदाथार्र्त (सरबते, फळांचे रस, बेकरी उत्पादने, इत्यादी) चवीसाठी साखर वापरली जाते. स्वादाप्रमाणेच पदार्थ टिकविण्यासाठी म्हणजे परिरक्षक म्हणूनही साखरेचा वापर केला जातो. उदा. मुराम्बा, मोरावळा, इत्यादी. साखरेचा वापर फक्त खाद्यपदार्थातच नाही तर इतर उद्योगांतही केला जातो. साखरेवर रासायनिक प्रक्रिया करून हजारो पदार्थ तयार करतात. प्लास्टिक, औषधनिर्मिती, शीतपेये, सिमेंट, विद्युतविलेपन, गोंद, चर्मोद्योग, स्फोटक पदार्थ, शवसंलेपन, खते अशा अनेक उद्योगांत साखरेचा उपयोग होतो.
चारुशीला जुईकर (मुंबई) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
कुतूहल- साखरेचा उपयोग
आपल्या जीवनातून साखर काढून टाकली तर? असा विचार करून पाहा. सर्व जीवनच नीरस, अगोड वाटायला लागेल. शिवाय हेही महत्त्वाचं आहे की, सर्व सजीवांना कबरेदकांपासून ऊर्जा मिळते आणि त्यात साखरेची भूमिका महत्त्वाची आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 22-08-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Use of sugar