सर्वसामान्यपणे पॉलिस्टर तंतूची लंबनक्षमता ही २० ते २५ टक्के इतकी असते. ही लंबनक्षमता तन्यतेच्या व्यस्त प्रमाणात असते, म्हणजे जशी तन्यता वाढत जाते तशी लंबनक्षमता कमी होते. मध्यम तन्यतेच्या तंतूंची लंबनक्षमता २५% ते ३०% असते; तर उच्च तन्यतेच्या तंतूची १६ % ते २०% असते. अतिउच्च तन्यतेच्या तंतूंसाठी लंबनक्षमता १२ % ते १६% इतकी असते. अतिशय चांगली ताकद / तन्यता व उच्च लंबनक्षमता यामुळे पॉलिस्टर तंतूंपासून तयार केलेल्या कपडय़ांमध्ये एक दोष निर्माण होतो. कपडे वापरत असताना लहान गुठळ्या तयार होण्याची प्रवृत्ती असते. कपडय़ांच्या वापरामध्ये कपडय़ांचे बाह्य़वस्तूंशी घर्षण होते. या घर्षणामुळे कपडय़ांतील तंतू बाहेर खेचले जातात. उच्च लंबनक्षमतेमुळे तंतू मोठय़ा प्रमाणात लांबतात, पण उच्च तन्यतेमुळे ते तुटत नाहीत. हे लांबलेले तंतू तसेच गोळा होऊन कपडय़ांवर गुठळ्यांच्या रूपात कपडय़ांना चिकटून राहतात. हा दोष नाहीसा करण्यासाठी कमी गुठळ्या होणारा तंतू तयार करण्यात आले. या तंतूंची तन्यता कमी करण्यात आली. यामुळे घर्षणाने तंतू लांबले असता ते तुटतात आणि गुठळ्या तयार होत नाहीत.
पॉलिस्टर तंतूची स्थितिस्थापकता अतिशय चांगली असते. त्यामुळे या तंतूंपासून तयार केलेले कपडे सहजपणे चुरगळत नाहीत, परंतु हे तंतू उष्णतेमुळे स्थितिस्थापकता नाहीशी होणारे असतात. या गुणधर्मामुळे या तंतूंना उष्णता देऊन त्यांचे तापमान ८० अंश से.च्यावर नेले असता त्यांची स्थितिस्थापकता नाहीशी होते आणि या तंतूंना या स्थितीत कोणताही आकार दिला असता तो कायम राहतो. यामुळेच पॉलिस्टरपासून बनविलेल्या कपडय़ांना इस्त्री केली असता इस्त्रीच्या घडय़ा कायमपणे टिकतात.  पॉलिस्टर तंतूंच्या उच्च तन्यतेबरोबरच त्यांची घर्षणरोधक क्षमताही उच्च असल्यामुळे या तंतूंपासून बनविलेले कपडे दीर्घकाळ टिकतात.
पॉलिस्टर तंतूंची स्थितिस्थापकता उष्णतेने नाहीशी होत असल्यामुळे, तो गुणधर्म तसाच राहिला असता तर नेहमीच्या वापरात हे कपडे उच्च तापमानास आकुंचन पावले असते. असे होऊ नये यासाठी कापड तयार झाल्यावर त्याला ताण देऊन त्याचे तापमान १८० ते २१० अंश से. इतके वाढवले जाते. ज्यामुळे या तापमानास दिलेले आकारमान हे कायम राहते. या प्रक्रियेस उष्णता स्थिरीकरण असे म्हणतात. नेहमीच्या वापरात जोपर्यंत उष्णता स्थिरीकरणाच्या प्रक्रियेत दिलेल्या तापमानाच्या वरती तापमान जात नाही तोपर्यंत कपडय़ांचा आकार बदलत नाही. यामुळेच पॉलिस्टरच्या कपडय़ांना इस्त्री करताना तापमान नियंत्रित (गरमऐवजी कोमटच) ठेवावे लागते.  
चं. द. कोणे (इचलकरंजी) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org

संस्थानांची बखर – रणजीत सिंहांचे युरोपीय सेनाधिकारी
महाराजा रणजीत सिंहांनी आपल्या सन्याचे नियोजन अत्यंत पद्धतशीरपणे केले होते. त्यांच्या प्रबळ सनिकी शक्तीमुळे ईस्ट इंडिया कंपनीचे सरकारही रणजीत सिंहांच्या हयातीत त्यांच्या शीख साम्राज्याला हात लावण्याची िहमत करू शकले नाही. त्यांच्या सन्यात शीख, िहदू आणि मुस्लीम या तिन्ही धर्माच्या सनिकांचा भरणा होताच पण सेनाधिकारीही सर्व धर्माचे होते. १८२२ साली दोन युरोपियन सेनाधिकारी, व्हेंचुरा हा इटालियन आणि अलार्ड हा फ्रेंच हे दोघे लाहोरात रणजीतसिंहांच्या दरबारात नोकरीच्या शोधात आले. हे दोघे पूर्वी नेपोलियनच्या फ्रेंच शाही सन्यात वरिष्ठ पदावर नोकरीस होते. वॉटर्लूतील नेपोलियनच्या पराजयानंतर ते युरोप सोडून पूर्वेकडे नोकरीच्या शोधार्थ आले.
महाराजांनी त्यांचा सन्यदलातील अनुभव पाहून, पण  बिटिशांशी काही संबंध नाही ना याची खातरजमा करूनच त्यांना आपल्या नोकरीत घेतले. कोणत्याही युरोपियन देशाशी महाराजांच्या सेनेचे युद्ध झाल्यास हे दोघे महाराजांशीच निष्ठावंत राहतील असा करारही त्यांच्याकडून लिहून घेतला गेला. महाराजांनी त्यांना प्रत्येकी पाचशे घोडदळाचे नेतृत्व दिले. व्हेंचुराच्या सन्याचे नाव होते फौज-इ-खास आणि अलार्डवर नवीन तोफदल तयार करण्याची कामगिरी सोपविण्यात आली. दोघांनी लाहोरमध्ये स्थायिक होऊन आपली कामगिरी व्यवस्थित पार पाडली. त्यांचा चांगला अनुभव आल्यावर महाराजांनी सन्यात आणि प्रशासनातही अनेक युरोपियन अधिकारी नियुक्त केले.
डॉ. होनिगबर्गर या हंगेरियन अधिकाऱ्याला पेशावरच्या राज्यपालपदी नेमले. जनरल कोर्ट (फ्रेंच) यांना तोफदल प्रमुख, डॉ. हरलॉन (अमेरिकन) हे गुजरातचे राज्यपाल तसेच लष्करी तंत्रज्ञ  हर्बन (स्पॅनिश), सन्याचे सर्जन-डॉक्टर डॉ. बेनेट (फ्रेंच), बटालियन कमांडर हेन्री स्टाइनबाख (जर्मन) तसेच व्यूकेनवीच या रशियन नागरिकाला घोडदळात उच्चपदावर नियुक्त करून महाराजांनी त्यांच्यावर पूर्ण विश्वास टाकला होता. गिलीमोर, लेस्ली, हार्वे, फिट्झरॉय या इंग्रज व्यक्तींनाही महाराजांनी आपल्या दरबारात महत्त्वाच्या जागा दिल्या होत्या.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com

Story img Loader