मागावरून निघालेले सुती कापड दोषासाठी तपासणी करून, पुढील प्रक्रियेत अडथळा येऊ नये अशी काळजी घेऊन पुढील प्रक्रियेसाठी पाठवले जाते. सूत आणि कापडनिर्मिती होत असताना अनेक यंत्रावरून त्याचा प्रवास होतो. त्यामुळे धूळ वगरे अनावश्यक पदार्थ कापडाबरोबर असतात. त्यामुळे सर्वात पहिली प्रक्रिया म्हणजे धुलाई. यासाठी कापड यंत्राच्या साहाय्याने धुतले जाते. या यंत्रात साबण आणि सोडा यांचे द्रावण वापरले जाते. शिवाय कापड यंत्रात असताना त्यावर पाण्याचे फवारे मारले जातात. कापड स्वच्छ करणे आणि कापडात धुलाईच्या रसायनांचा अंश राहू नये, असे दोन्ही उद्देश हे पाणी मारण्याच्या पाठीमागे असतात. पुढील प्रक्रियेसाठी याचा फायदा होतो.
सुती कापड विणण्यापूर्वी ताण्यासाठी (उभे धागे- कापडाच्या किनारीला समांतर धागे) वापरलेल्या सुतास कांजी किंवा खळ यांचा लेप लावलेला असतो. कापड विणताना येणारा ताण सहन करण्याची शक्ती देण्यासाठी असे केलेले असते. कापड विणून तयार झाल्यावर त्याची गरज नसते. म्हणून हा लेप काढून टाकतात. त्याला डिसाइिझग असे म्हणतात. या प्रक्रियेत स्टार्चसारखे नसíगक घटक आणि काही जलविद्राव्य घटक काढून टाकले जातात. या कामासाठी चार वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब केला जातो. पहिली पद्धत नेहमीच्या तापमानाला असलेल्या पाण्यात हे कापड किमान २४ तास बुडवून ठेवून कांजी काढली जाते. ही सर्वात स्वस्त पण वेळखाऊ पद्धत आहे. दुसऱ्या पद्धतीत विकरांच्या (एन्झाइम्स) साहाय्याने ही प्रक्रिया करतात. विकरांच्या द्रावणात कापड ८ तास भिजवून ठेवले जाते. हे करताना विकराबरोबर मिठाचाही वापर केला जातो. तिसऱ्या पद्धतीत हायड्रोक्लोरिक आम्लाचा वापर करतात. पुढे छपाई किंवा रंगाईकरिता जाणाऱ्या कापडासाठी या पद्धतीचा वापर केला जातो. या पद्धतीत हायड्रोक्लोरिक आम्लाचा वापर करतात आणि द्रावणात कापड ठेवण्याचा कालावधी चार तास एवढा असतो. कापडात विणलेले रंगीत सूत असल्यास (उदा. धोतर) चौथ्या पद्धतीचा वापर करतात. या पद्धतीत सोडियम हायपोक्लोराइटचा वापर केला जातो. ठरावीक प्रमाणात हायपोक्लोराइट घेऊन त्या द्रावणात कापड तीन तास भिजवून ठेवतात. चारही पद्धतीत या प्रक्रियेनंतर पुन्हा कापडाची धुलाई करून ते पुढील प्रक्रियेसाठी पाठवले जाते.
दिलीप हेल्रेकर (मुंबई) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा