पिण्याच्या पाण्याचे प्रदूषण जैविक, सूक्ष्मजीवशास्त्रीय, रासायनिक, भौतिक किंवा किरणोत्सारी पदार्थामुळे होऊ शकते. आपण आज सूक्ष्मजीवशास्त्रीय प्रदूषणाचे मोजमाप कसे करतात, ते पाहू.

पाण्यातील रोगकारक जंतूंची संख्या प्रत्यक्ष मोजणे वेळखाऊ असल्यामुळे संख्यात्मक पद्धतीपेक्षा गुणात्मक पद्धतीचा अवलंब केला जातो. यापकी एक पद्धत म्हणजे एम.पी.एन. (मोस्ट प्रॉबेबल नंबर) तंत्र, म्हणजे रोगकारक सूक्ष्मजंतूंच्या जास्तीत जास्त शक्यतेचा अंक काढण्याचे तंत्र. ही एक संख्याशास्त्रीय पद्धत आहे.

chemical manufacturing industries in india stock market share prices
क्षेत्र अभ्यास अजब रसायन बाजार
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
sixth mass extinction earth currently experiencing a sixth mass extinction
पृथ्वीवरील बहुतेक जीवसृष्टी नष्ट होण्याच्या मार्गावर? काय सांगतो ‘सहाव्या महाविलोपना’चा सिद्धान्त?
India Meteorological Department has warned a rain alert for 15 districts of Maharashtra state
‘या’ १५ जिल्ह्यांना १५ नोव्हेंबरला सतर्कतेचा इशारा !
Moringa or drumstick
Fact check : खरंच शेवग्यामध्ये दह्यापेक्षा नऊ पट जास्त प्रथिने असतात? तज्ज्ञांनी केला खुलासा
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : नीतिशास्त्र, सचोटी  आणि नैसर्गिक क्षमता
mpcb issues notice to hinjewadi it park over functioning of common sewage treatment plan
हिंजवडी आयटी पार्कला जलप्रदूषणासाठी नोटीस; सामाईक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावर प्रदूषण नियंत्रण मंडळाचा ठपका

रोगकारक जंतूंचा प्रतिनिधी म्हणून नेहमीच जास्त संख्येने पाण्यात अस्तित्वात असलेल्या ‘इशचेरीशिया कोलाय’ याला दर्शक जिवाणू मानून त्याच्या अस्तित्वाच्या शक्यतेला यात प्रमाणभूत मानले जाते. हा जिवाणू आतडय़ात वास्तव्य करतो आणि विष्ठेवाटे पाण्यात येतो. या जंतुपरिवाराला ‘कोलायफॉर्म’ असे म्हणतात. या जिवाणूंची विशिष्ट द्रव माध्यमात वाढ झाली तर त्या माध्यमाचा रंग बदलतो. याला सकारात्मक प्रक्रिया असे म्हणतात; परंतु जर रंग बदलला नाही, याचा अर्थ पाण्याच्या नमुन्यात कोलायफॉर्मचे नाहीत. याला नकारात्मक प्रक्रिया असे म्हणतात. ही पद्धती तीन पायऱ्यांमध्ये पूर्ण केली जाते.

पहिली ‘प्रिझम्टिव्ह’ चाचणी म्हणजे कोलायफॉर्मच्या अस्तित्वाच्या शक्यतेची चाचणी, दुसरी ‘कन्फम्र्ड’ चाचणी म्हणजे कोलायफॉर्मचे अस्तित्व अधिकृतरीत्या सिद्ध झाल्याची चाचणी आणि तिसरी म्हणजे ‘कम्प्लीटेड’ चाचणी म्हणजे कोलायफॉर्मच्या अस्तित्वाची परिपूर्ण सिद्धता. यात प्रदूषणाचा अंदाज बांधण्यासाठी पहिली चाचणी पुरेशी ठरते. या चाचणीला २४ तास लागतात आणि या पद्धतीने पिण्याच्या पाण्याची गुणवत्तादेखील आपण निश्चित करू शकतो.

प्रिझम्टिव्ह चाचणीत लॅक्टोज शर्करा असलेल्या ‘मेकोन्की पर्पल’ या द्रवमाध्यमाचा वापर केला जातो. त्यात पाण्याचा नमुना घालतात. पाण्याचे आकारमान व त्याची घेतलेली तीव्रता यांची नोंद केली जाते. या नलिकेत एक लहान नलिका (डरहेम) नलिका उपडी टाकतात.

पाण्याच्या नमुन्यात जर कोलायफॉर्म असतील, तर ते माध्यमातील लॅक्टोज साखरेचे रूपांतर लॅक्टिक आम्लात करतात. डरहेम नलिकेत वायूचे बुडबुडे दिसतात आणि माध्यमाचा लाल रंग पिवळा होतो. कोलायफॉर्मच्या तीव्रतेनुसार रंगात फरक दिसतो.

संख्याशास्त्रीय पद्धतीने कोलायफॉर्म जंतूंची संख्या आपल्याला मिळू शकते. त्या संख्येनुसार पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता उत्तम, चांगली, बरी की अयोग्य अशी प्रतवारी करता येते.

untitled-19

डॉ. रंजन गर्गे

मराठी विज्ञान परिषद,

वि. ना. पुरव मार्गचुनाभट्टीमुंबई २२ 

office@mavipamumbai.org

 

ज्ञानपीठ-विजेती मुक्कजी

ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ‘मुक्कजिय कनसुगलु’या कादंबरीतून कारन्तांनी इतिहासपूर्व काळापासून वर्तमान काळापर्यंतचा मानवसभ्यतेचा परिचय करून देण्याचा प्रयत्न केला आहे. मुक्कजी म्हणजे मूक राहणारी आजी- मूळ नाव मूकाम्बिका. बाल विधवा, पण आता ऐंशी वर्षांची. तिचा नातू सुब्बा- याच्या शंकांचे, कल्पनांचे, कुतूहलाचे शमन करण्याच्या प्रयत्नांतून त्या दोघांतील संवादातून या कादंबरीचा कथापट उलगडत जातो. मानवाच्या जगण्यातील विषमता बघत, पिंपळाच्या पायथ्याशी उठत-बसत, सगळे काही मनातल्या मनात ती सतत पुटपुटत राहते, अतिंद्रिय शक्तीने भूतकाळापासून ते वर्तमानकाळापर्यंत अनेक घटनांच्या संदर्भात मानवी मनोवृत्तीविषयी भाष्य करते. दु:ख भोगलेली ही म्हातारी जीवनाकडे नव्या दृष्टिकोनातून बघायला शिकविते.  ही आजी घरातच डोळे मिटून, ध्यान करीत असे. जपमाळ नाही की, मुखी नाम नाही. घरातील कठोर व्रतांविषयी तिला आस्था नव्हती. ती म्हणायची, ‘विश्वातील अवघ्या मानवांनी मिळवून एका ईश्वरी सत्तेला मान्यता दिली आहे, पण तो ईश्वर काय करीत असतो कोणास ठाऊक? आम्हीच त्याला प्रश्न विचारतो आणि त्याची उत्तरेही आम्हीच देतो! आपल्या मनासारखे घडले तर म्हणणार, ‘ईश्वराची कृपा’ आणि विपरीत झाले तर ‘ईश्वराला हेच मंजूर होतं ’  म्हणून मोकळे होणार.. वर एकेका देवाला हजार नावे! हा सर्व अज्ञानाचाच खेळ! नाही- तर भगवतीच्या इच्छेतून जन्मलेल्या बकऱ्या-म्हशींना, भगवतीसमोरच कसे बळी दिले असते लोकांनी! अज्ञानाचा हात धरूनच अन्यायही चालत असतो रे बाबा! बाळा, ज्ञानाच्या गप्पा मारल्या म्हणजे काही माणूस ज्ञानी होत नाही. या ज्ञानी लोकांनीच तर रामकृष्ण आणि शिव-ब्रह्म यांना मायाजालात फसवले आणि वर तेच म्हणतात, माया-मोहापलीकडे मुक्ती आहे. कोणाची मुक्ती? कोणापासून मुक्ती? बघ ना, वैष्णवदास पंथीयांनी घरदार त्यागून रात्रंदिवस भक्तिगीते गायली. मुक्तीसाठी ते शरण कुणाला गेले तर ज्यांच्या वामांगी देवी विराजमान आहे, जे स्वत: मोहजालात अडकले आहेत, अशा विष्णू वा शिवाला! यांना तरी अर्धागी कशाला हव्या होत्या? आपल्यातूनच त्यांनी सृष्टीची उत्पत्ती- स्थिती- लय का नाही साधले? त्यासाठी पुरुष-प्रकृतीच अनिवार्य का ठरावी? बघ ना, गोडी व पांगारा वृक्ष पाहिलेस? आणि नागवेली? छोटीशी फांदी लावली तरी रुजते. काही निम्नस्तरीय जीवांमध्ये तर एकच फुटून दोन होतात. नाही लागत तिथे नर-मादी भेद!’ .अशा प्रकारे अपूर्व व विलक्षण तर्क करणारी आजी विचारांची पक्की आहे. परंपरागत विचार-कल्पना तिने डोळे मिटून मुळीच स्वीकारलेल्या नाहीत.

मंगला गोखले

mangalagokhale22@gmail.com