पशुधनाचे व्यवस्थापन कसे करावे, याबद्दल पराशरांनी ‘कृषी पाराशर’ या प्राचीन ग्रंथात बारकाईने सूचना केल्या आहेत. बलांचा गोठा प्रशस्त असावा व तो नेहमी स्वच्छ ठेवावा. गोठय़ात मुसळ, झाडू बांधायची काठी ठेवू नये. गोठय़ात दिवा असावा. उसाची पाने, बार्ली आणि गहू यांचा आहार गुरांना द्यावा. शिवाय त्यांना चरायला सोडावे. त्यांना गरम पेज, मासे, धुतलेले पाणी, सरकी किंवा शिळेपाके अन्न देऊ नये. एवढेच नाही, तर तांब्याचे पात्र त्यांच्याजवळ ठेवू नये. बलांची दमछाक होईपर्यंत त्यांना नांगराला लावू नये. नांगराला जोडण्यापूर्वी बलाच्या तोंडाला आणि पाश्र्वभागाला तूप चोळावे. नांगराला जुंपण्यासाठी कोणत्या प्रकारचे बल निवडावेत, हे सांगून नांगराला आठ बल जोडण्याचा सल्ला ते देतात. सणासुदीला बलांच्या सजावटीकरीता कोणत्या पदार्थाचा वापर करावा, म्हणजे त्यांना रोगांची बाधा होणार नाही, हे पराशरांनी स्पष्ट केले आहे.
बियाणांमुळे शेतकऱ्याला पिकांचे भरघोस उत्पादन मिळू शकते. त्यामुळे बियाणांची काळजी कशी घ्यावी, याचे मार्गदर्शन त्यांनी केले आहे. बियाणे साठविताना त्यात इतर धान्यांच्या बियांची किंवा काडी कचऱ्याची मिसळ नसावी. धान्याचे बियाणे गोळा करून फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्ये ते चांगले वाळवावे, पण ते जमिनीवर पसरू नये. वाळले की ते पोत्यात भरावे. ही पोती ठेवण्याच्या खोलीत वाळवी किंवा ओलावा असू नये. गोठय़ात किंवा कामगारांच्या खोलीत या पोत्यांची साठवण करू नये. बियाणांवर चुकूनही तेल, तूप, ताक किंवा मीठ चोळू नये. बियाणाजवळ विस्तव किंवा धूर होऊ देऊ नये. विस्तवाच्या किंवा धुराच्या जवळ ठेवलेले बियाणे पेरू नये. तसेच चेपले गेलेले आणि कमी प्रतीच्या पदार्थात मिसळलेले बियाणेही पेरू नये,  असा सल्ला ते देतात. ज्या शेतकऱ्याने अश्विन (ऑक्टोबर) व काíतक (नोव्हेंबर) महिन्यात पाण्याची साठवणूक व्यवस्था केली नाही, त्याला सुगीचे दिवस दिसणार नाहीत, ही पराशरांची टिप्पणी एक प्रकारे सद्यस्थितीलाही तंतोतंत लागू पडणारी आहे.

जे देखे रवी.. – माझे वजन वाढले आहे
माझे वजन वाढले आहे हे वाक्य ९० टक्के लोकांच्या बाबतीत खोटे असते. कारण खरे असे म्हणायला हवे की, ‘मी माझे वजन वाढू दिले आहे. वजनाचा हिशेब खरे तर अगदी सोपा आहे. तुम्ही किती कॅलरीज खाता आणि किती खर्च करता यावर तुमचे बचत खाते ठरते. जे उष्मांक दवडले जात नाही ते शरीरात राहतात आणि काळापरत्वे त्यांचे स्निग्ध पदार्थात रूपांतर होऊन त्याचे थर आपल्या शरीरात जमा होतात. एकदा वाढलेले वजन कमी करणे अवघड आहे अर्थात वय वाढते तसे हे जाडय़ थोडेफार वाढणे नैसर्गिक समजले जाते.
हल्ली सर्व प्रकारच्या ऊ्री३२ चा जमाना आला आहे. एक माझी नातेवाईक आहे तिने फक्त प्रथिनांचा जगविख्यात आहार सुरू केला. चिकन, मटण, अंडय़ाचे पांढरे, थोडेफार दूध असला काहीतरी अघोरी कार्यक्रम. घरातले लोक कंटाळले, वजन तर कमी झालेच नाही; पण फळे आणि भाज्या नाहीत म्हणून हिला बद्धकोष्ठ झाले. शेवटी ही हरली आणि रागावून तिने दुसरे टोक गाठले आणि पूर्वीसारखी जेवू लागली तेव्हा हिचे परत वजन वाढले तेव्हा ही मला न सांगताच एका प्लास्टिक सर्जनकडे गेली आणि आपल्या पोटातली दोन-तीन लिटर चरबी तिने काढून घेली.
वजन होते ७५ किलो, दोन लिटर चरबीचे वजन जेमतेम दोन किलो भरते त्याने काय होणार? गंमत अशी आहे की, ज्याला स्निग्ध पेशी म्हणतात त्या जरी लाखोंनी काढल्या तरी ज्या उरतात त्यांचा स्वभाव काही बदलत नाही. त्या स्निग्ध गोष्टींच्या मागे असतातच आणि त्या वाढू शकतात आणि त्या जमा आणि खर्च या तत्त्वावरच चालतात. थोडेफार जाड असणे म्हणजे महारोग झाला आहे, अशी भावना लोक बाळगू लागले आहेत.
ज्या वरच्या नातेवाईक मुलीविषयी मी लिहिले तिचे वडील गोलमटोल आहेत आणि आई सडपातळ आहे. हिने वडिलांची शरीरयष्टी घेतली हे तिचे प्रारब्ध. ते ओळखून सुज्ञपणे वागायला हवे. आपल्याला किती कॅलरी पुरतात हे एकदा लक्षात आले की, जीवनसत्त्वे चांगल्या प्रमाणात घेऊन तासभर चालून वजन आपल्या आनुवांशिकतेच्या पलीकडे न जाऊ देणे सोपे होते. पण त्याऐवजी वर्तमानपत्रात आलेल्या जाहिरातीला थोडेफार फसून १५ दिवसांत पोट सपाट करण्याच्या मागे माणसे लागली आहेत.
होतही असेल सपाट. पण एक महिन्यात ते परत अफाट होते याचे कारण माणूस प्रारब्ध बदलू शकत नाही आणि त्याहून म्हत्त्वाचे जीवनशैली बदलणे फार अवघड जाते. ज्ञानेश्वर म्हणतात तसे..
ज्याने कल्याण होते।  ते या शरीराला बोचते।
नाहीतर योगासारखे सोपे। आहे तरी काय।।
रविन मायदेव थत्ते  rlthatte@gmail.com

Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
majority of bird species in india face decline
देशातील पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय घट; जाणून घ्या, मानवी चुका किती हानीकारक
Two houses including shop damaged in fire in Fernandiswadi
नाशिक : फर्नांडिसवाडीतील आगीत दुकानासह दोन घरांचे नुकसान
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
Five detox tips for rejuvenate your body
Post Diwali Detox Tips : सणासुदीला भरपूर गोड, तेलकट पदार्थ खाल्ले का? मग शरीर डिटॉक्स करण्यासाठी करून पाहा हे पाच उपाय
Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय
Viral Video Shows Pet Dog Help Her Owner
मैं हूँ ना…! मालकिणीला मदत करण्यासाठी श्वानाची धडपड; काठी काढण्यासाठी मारली उडी अन्… पाहा VIRAL VIDEO

वॉर अँड पीस-एच.आय.व्ही.- एड्स : आयुर्वेदीय विचार : भाग १
एड्स हा विकार वैद्यकीय क्षेत्रात बरेच महत्त्व, लक्ष मिळवून बसला आहे. हा रोग नव्याने मानवी जीवनात आला, असे काहींचे म्हणणे आहे. जगाच्या सुरुवातीपासून वेश्यागमन व समसंभोग या गोष्टी मानवी जीवनातील एक भाग म्हणून होत्या, आजही आहेत, पुढेही राहतील. एड्स या विकाराची ही प्रमुख कारणे नव्याने उद्भवलेली नाहीत. या दोन कारणांनी आज फार पसरत जाणारा विकार फार प्राचीन काळापासून असावा. आज आधुनिक विज्ञानाची मदत घेऊन, त्या विकाराचा जंतू निश्चित करता येतो. आधुनिक विज्ञानाचा बराचसा भर रोगजंतूंवर आहे. रोगजंतू हे स्थळ व कालसापेक्ष आहेत. आज असणारे जंतू कदाचित काल नव्हते, उद्या नसतील, तसेच हे जंतू हिंदुस्थानात असले तर अमेरिकेत कदाचित नसतील, आफ्रिकेत असतील. तेव्हा एड्ससारख्या वेगात केवळ जंतूच्या मागे लागलो तर रोगप्रतिकारशक्ती या घटकाकडे दुर्लक्ष होईल.
प्राचीन काळापासून ‘प्रतिलोम क्षय’ किंवा ‘शोष’ हा विकार सुश्रुतसंहिता व इतर ग्रंथांत वर्णन केलेला दिसतो. त्यात वर्णन केलेली लक्षणे व आजच्या पूर्णपणे एड्सग्रस्त विकाराची लक्षणे जवळपास सारखीच आहेत. शरीरात आपण घेत असलेल्या आहारामुळे दर क्षणाला रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा व शुक्र या सात धातूंचे क्रमाने पोषण, शरीरवर्धन, झीज भरून काढणे व ओजवृद्धी हे कार्य होत असते. या उलट क्षय किंवा शोष विकारांत हे धातू क्रमाक्रमाने क्षीण होत जातात. दुर्बळ होतात.
प्रतिलोम क्षय किंवा शोष या विकारांत प्रथम शुक्र या धातूवर आघात होतो. त्यानंतर उलट क्रमाने एकेक धातू-मज्जा, अस्थी, मेद इत्यादी क्षीण होत जातात. त्यामुळे वजन घटणे, अरुची, ज्वर, अतिसार, दीनता इत्यादी लक्षणांनी युक्त प्रतिलोम क्षय विकाराने रुग्ण ग्रस्त होतो. एड्स या विकारात वेश्यागमन व समसंभोगातील शुक्राच्या अतियोगामुळे स्त्रीपुरुषांत हा विकार होऊ शकतो. एचआयव्हीग्रस्त इसमाचे रक्त अनवधानाने दिल्यास या रोगाची बाधा होऊ शकते.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत – १९ मार्च
१८२४ > ‘ग्रहसाधनांची कोष्टके’ व ‘पंचांग कोष्टके’सह खगोलीय गणिताची तसेच विज्ञानविषयक पुस्तके लिहिणारे गणितज्ञ प्रा. केरो लक्ष्मण छत्रे यांचा जन्म. टिळक पंचांगाची पायाभरणी त्यांच्या अभ्यासामुळे होऊ शकली.
१८४८ > ‘लोकहितवादी’ गोपाळराव हरी देशमुख यांच्या ‘शतपत्रां’तील पहिले पत्र या दिवशी ‘प्रभाकर’या वृत्तपत्रात छापून आले. १८९२> ग्रंथकार जनार्दन बाळाजी मोडक यांचे निधन. प्राचीन मराठी काव्य, जुन्या बखर तसेच अप्रसिद्ध संस्कृत ग्रंथ प्रकाशित करणाऱ्या ‘काव्येतिहाससंग्रह’ या मासिकाचे ते एक संस्थापक-संस्थापक होते. मोडक यांनी ‘महाराष्ट्रकवि आनंदतनय’ आणि ‘महाराष्ट्रकवि अमृतराय’ या मध्ययुगीन मराठी कवींचे काव्यग्रंथ टीपांसह संपादित केले. ‘भास्कराचार्य व तत्कृत ज्योतिष’ व ‘वेदांग  ज्योतिष’ ही पुस्तके लिहिली, तसेच ‘ठाणे जिल्ह्याचे वर्णन’ देखील त्यांनी लिहिले होते.
१९३६> चित्रपट व चित्रवाणी क्षेत्रातील दिग्दर्शिका आणि मराठी बालवाङ्मय तसेच नाटक लेखनात महत्त्वाची भर घालणाऱ्या सई परांजपे यांचा जन्म. ‘जास्वंदी’ (नाटक) शेपटीचा शाप, भटक्याचे भविष्य, सळो की पळो (बालनाटय़े) हरवलेल्या खेळण्यांचे राज्य (बालकादंबरी) विशेष वाचनीय आहेत.
– संजय वझरेकर