पशुधनाचे व्यवस्थापन कसे करावे, याबद्दल पराशरांनी ‘कृषी पाराशर’ या प्राचीन ग्रंथात बारकाईने सूचना केल्या आहेत. बलांचा गोठा प्रशस्त असावा व तो नेहमी स्वच्छ ठेवावा. गोठय़ात मुसळ, झाडू बांधायची काठी ठेवू नये. गोठय़ात दिवा असावा. उसाची पाने, बार्ली आणि गहू यांचा आहार गुरांना द्यावा. शिवाय त्यांना चरायला सोडावे. त्यांना गरम पेज, मासे, धुतलेले पाणी, सरकी किंवा शिळेपाके अन्न देऊ नये. एवढेच नाही, तर तांब्याचे पात्र त्यांच्याजवळ ठेवू नये. बलांची दमछाक होईपर्यंत त्यांना नांगराला लावू नये. नांगराला जोडण्यापूर्वी बलाच्या तोंडाला आणि पाश्र्वभागाला तूप चोळावे. नांगराला जुंपण्यासाठी कोणत्या प्रकारचे बल निवडावेत, हे सांगून नांगराला आठ बल जोडण्याचा सल्ला ते देतात. सणासुदीला बलांच्या सजावटीकरीता कोणत्या पदार्थाचा वापर करावा, म्हणजे त्यांना रोगांची बाधा होणार नाही, हे पराशरांनी स्पष्ट केले आहे.
बियाणांमुळे शेतकऱ्याला पिकांचे भरघोस उत्पादन मिळू शकते. त्यामुळे बियाणांची काळजी कशी घ्यावी, याचे मार्गदर्शन त्यांनी केले आहे. बियाणे साठविताना त्यात इतर धान्यांच्या बियांची किंवा काडी कचऱ्याची मिसळ नसावी. धान्याचे बियाणे गोळा करून फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्ये ते चांगले वाळवावे, पण ते जमिनीवर पसरू नये. वाळले की ते पोत्यात भरावे. ही पोती ठेवण्याच्या खोलीत वाळवी किंवा ओलावा असू नये. गोठय़ात किंवा कामगारांच्या खोलीत या पोत्यांची साठवण करू नये. बियाणांवर चुकूनही तेल, तूप, ताक किंवा मीठ चोळू नये. बियाणाजवळ विस्तव किंवा धूर होऊ देऊ नये. विस्तवाच्या किंवा धुराच्या जवळ ठेवलेले बियाणे पेरू नये. तसेच चेपले गेलेले आणि कमी प्रतीच्या पदार्थात मिसळलेले बियाणेही पेरू नये, असा सल्ला ते देतात. ज्या शेतकऱ्याने अश्विन (ऑक्टोबर) व काíतक (नोव्हेंबर) महिन्यात पाण्याची साठवणूक व्यवस्था केली नाही, त्याला सुगीचे दिवस दिसणार नाहीत, ही पराशरांची टिप्पणी एक प्रकारे सद्यस्थितीलाही तंतोतंत लागू पडणारी आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा