मागच्या लेखात स्त्री हीच प्राथमिक जीव असतो असे मी म्हटले ते मी कोठे तरी वाचले होते. आफ्रिकेतल्या त्या अनादिमानवीचे छायाचित्रही छापून आले होते. परंतु तो संदर्भ शोधणार कसा? मग मी माझ्या स्वभावाप्रमाणे चौकशी सुरू केली. रुची या नियतकालिकात उज्ज्वला दळवी जनुकांवर फार सुंदर लिहीत असे. तिला संगणकामार्फत पत्र पाठवले. तिचे क्षणार्धात उत्तर आले. तिने मोठय़ा सावधपणे लिहिले आहे. ‘३०० दशलक्ष वर्षांपूर्वी लिंगभेदच नव्हता. तो भेद आला तेव्हा लिंग ही गोष्ट दोन ७ ७ या जनुकातल्या जोडीने अवतरली. ही जोडी पुढे स्त्रियांमध्ये स्थिरावली. परंतु यातल्या एका ७मध्ये पुढे बदल होत गेले आणि हे बदल होत होत एक छोटेसे नवीनच प्रकरण उद्भवले ते म्हणजे ८. हा ८ म्हणजे पुरुष होण्यासाठी लागणारे जनुक. तिने लिहिले आहे की, एका अर्थाने हा ८ मूळच्या ७चाच अवतार आहे. गर्भधारणा झाल्यावर गर्भात पहिले काही आठवडे लिंगभेद नसतो. जर हा उपटसुंभ ८ हजर असेल तरच मग शुक्र निर्माण करणारे इंद्रिय तयार होते. जर नसेल तर बीजांडकोश म्हणजे ovaries तयार होण्याचा क्रम तसाच राहतो. दुसरे असे की जर हे ८ नावाचे जनुक आळशी असेल तर ते जनुक निरोपच पाठवत नाही आणि मग स्त्री निर्माण होते. ती स्त्रीसारखीच असते पण तिच्यातले हे ८ जनुक तिला मुले होण्यास प्रतिबंध करते.’ ‘माझा निखिल थत्ते नावाचा एक पुतण्या आहे नुकताच टइइर झाला. वयाच्या मानाने हा प्रकांड आहे. ‘माझ्या स्त्री हेच मूळ मानवी अस्तित्व’ या कवित्वाला त्याने प्रथम एखाद्या जातिवंत वैज्ञानिकांसारखा विरोधच केला. मग मी वकिली करायला सुरुवात केल्यावर हळूहळू माहिती बाहेर येऊ लागली. स्त्रियांमध्ये पुरुषसत्त्व Androgen नगण्य असते. परंतु पुरुषांमधे स्त्रीत्वाचे रसायन म्हणजे Oestrogen त्या मानाने खूप जास्त प्रमाणात असते. तसेच ७ ८ या पुरुषाच्या जनुकांमधला ८ जर शून्य असेल किंवा कमी असेल तरी पुरुष नावाचा प्रकार निर्माण होऊ शकतो, परंतु तो वंध्य आणि स्त्रंण असतो. या सगळ्या गोष्टीत एक गोष्ट नक्की ठरते की लिंगभेदाच्या जनुकांमधल्या जोडीत जर x जनुकच नसेल तर y y असा गर्भ तयारच होऊ शकत नाही. पूर्वी Mr x अशी एक मोठी उत्कंठावर्धक गोष्ट क्रमश: माध्यमातून छापून येत असे. पुढे त्याचा चित्रपटही आला. पण जनुकशास्त्राप्रमाणे Mr x असूच शकत नाही. असलाच तर तो असतो Mr xy. खरी असते miss x जर कोणी y भेटला तर ही होते Mrs x. मग xx होणार की xy हे केवळ कर्मधर्मसंयोगाने ठरते.
– रविन मायदेव थत्ते
rlthatte@gmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा