कासा, विजय राऊत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालघर जिल्ह्यात शिक्षण विभागात अनेक वर्षांपासून पदोन्नती ने भरावयाची पदे रिक्त असल्याने, त्याचा प्रशासकीय कामावर विपरीत परिणाम होताना दिसून येत आहे. जिल्ह्यातील १५१ केंद्रप्रमुख पदे असताना फक्त २३ केंद्रप्रमुख कार्यरत असून १२८ केंद्रप्रमुख पदे रिक्त आहेत. त्याचप्रमाणे विस्ताराधिकारी, मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक हेही पदे पदोन्नतीने भरली जातात तीही पदे रिक्त आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ तसेच प्रशासकीय काम यामध्ये मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे.

हेही वाचा >>> पालघर: पुढील शैक्षणिक वर्षापर्यंत बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी पूर्ण होणार; जिल्हा परिषदेकडून विशेष निधीची करणार तरतूद

पालघर जिल्ह्यामध्ये जवळपास १५१ केंद्र असून केंद्रावर नियंत्रण ठेवणे,तालुका आणि केंद्र  यामध्ये माहितीची देवाण घेवाण करणे या कामासाठी १५१केंद्रप्रमुख पदे निर्माण केली आहेत. व ही पदे पूर्वी पदोन्नतीच्या माध्यमातून भरली जात होती परंतु शासननिर्णया नुसार यातील काही पदे स्पर्धा परीक्षेतून तर काही पदे पदोन्नतीने भरावयाची आहेत. परंतु स्पर्धा परीक्षाही होत नाही आणि पदोन्नतीही होत नाही त्यामुळे ही पदे रिक्तच आहेत. या रिक्त पदावर केंद्रातून काम करण्यास इच्छुक असणाऱ्या शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. व ऑनलाइन पद्धतीने केंद्रातून माहिती गोळा तालुका प्रशासनाला पाठवण्याची जबाबदारी देण्यात आली. परंतु त्यातही अनेक केंद्रप्रमुख हे स्वतःच्या शाळेवर काम करण्याऐवजी केंद्रातील इतर शाळांना भेटी देत फिरतात. त्यामुळे त्यांची मूळ नियुक्ती ज्या शाळेवर आहेत, त्या शाळेवर मात्र प्रत्यक्ष अध्यापन करत नाहीत. त्यामुळे त्या शाळेतील विद्यार्थ्यांचेही नुकसान होते. तरी हे रिक्त पदे भरली जावीत अशी अपेक्षा पालक करत आहेत.

हेही वाचा >>> डहाणू नगरपरिषद कर्मचाऱ्याला मारहाण, एका व्यक्तीवर गुन्हा दाखल, अटकेची मागणी घेऊन कर्मचाऱ्यांचे आंदोलन

त्याचप्रमाणे  जिल्ह्यामध्ये विस्ताराधिकारी, मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक व शिक्षकांची पदेही रिक्त आहेत. मुख्याध्यापक पदे रिक्त असल्यानेही जिल्ह्यातील अनेक शाळेतील इतर शिक्षकांना मुख्याध्यापकांचे काम करावे लागते. पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शिक्षकांची पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे पेसा भरती करून भरण्यात आली परंतु या भरतीचा वाद न्यायालयात गेला असल्याने हे शिक्षकही हजर होऊ शकले नाही. शिक्षण विभागात इतक्या मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्याने गुणवत्ता विकास होण्यास अडथळा निर्माण होत आहे. तरी या सर्व रिक्त जागा लवकरात लवकर भराव्यात अशी मागणी केली जात आहे.

पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शिक्षकांची पदे रिक्त आहेत. परंतु प्रशासकीय कामात अडथळा येऊ नये रिक्त केंद्रप्रमुख पदावर तात्पुरत्या स्वरूपात शिक्षकांची नियुक्ती केली आहे. त्या प्रभारी केंद्रप्रमुखांनी कुठल्याही प्रकारची फिरती करू नये किंवा इतर शाळांना भेटी देऊ नयेत अशा स्पष्ट सूचना वारंवार देण्यात आल्या आहेत. तरीही स्वतःची शाळा सोडून इतर शाळांना प्रभारी केंद्रप्रमुख  भेटी देत असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. प्रकाश निकम (अध्यक्ष, जि.प.पालघर )

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 128 center heads posts vacant in palghar education department due to promotions zws
Show comments