कासा : समाजमाध्यमावर मैत्री करून जवळीक निर्माण करत रेल्वेत नोकरीचे आमिष दाखवून एका तरुणीची फसवणूक केल्याप्रकरणी तरुणीने कासा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. याप्रकरणी कासा पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डहाणू तालुक्यातील योगिता चौधरी हिच्याशी बोईसर येथील दीपक दर्शन याने ‘फेसबुक’द्वारे मैत्री केली. त्यानंतर तिला नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून तिच्याकडून चार लाख रुपये घेतले. नोकरीसाठी योगिताने दीपकला फोन केले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संशय आल्याने योगिताने कासा पोलीस ठाण्यात दीपकविरुद्ध तक्रार दाखल केली.

योगिताच्या तक्रारीनुसार कासा पोलीस ठाणे प्रभारी नामदेव बडगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप नागरे यांनी सापळा रचून मुख्य आरोपी दीपक दर्शन याला नाशिक, तर विवेक चंद्रा आणि दीपक पाल या दोघांना उत्तर प्रदेशातून अटक केली आहे. आरोपींची चौकशी केली असता त्यांनी ‘फेसबुक’च्या माध्यमातून अनेक तरुण-तरुणींची फसवणूक केली असून, आतापर्यंत २४ लाख रुपये उकळल्याची माहिती दिली आहे. योगितापाठोपाठ आणखी तीन जणांनी कासा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, आरोपींना शनिवारी डहाणू न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना पोलीस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.