पालघर : पालघर जिल्हयामध्ये एकूण १८,९१,६१६ इतके लाभार्थी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा लाभ घेत असून १३,२१,१८९ लाभार्थ्यांनी ई-केवायसी पूर्ण केले आहेत. त्यापैकी ५,७०,४२७ इतक्या लाभार्थ्यांची ई-केवासयी प्रलंबित आहेत. शिधापत्रिकांमध्ये आधार क्रमांक संलग्न करण्यात आलेले लाभार्थीचअन्नधान्याचा लाभ घेत असल्याची खात्री करण्यासाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील सर्व लाभार्थ्यांची ई-केवासयी करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये समाविष्ठ असणा-या लाभार्थ्यांचे शिधावाटप व्यवस्थापन प्रणालीमध्ये आधार क्रमांक शिधापत्रिकांसोबत संलग्न करण्यात आले आहे. पालघर जिल्हयामध्ये एकूण १८,९१,६१६ लाभार्थी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा लाभ घेत असून १३,२१,१८९ लाभार्थ्यांनी ई-केवायसी पूर्ण केलेली आहे. उर्वरित ५,७०,४२७ इतक्या लाभार्थ्यांची ई-केवासयी प्रलंबित आहे. केंद्र शासनाकडील २५ मार्च रोजी ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी ३० एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
शिधापत्रिकांमध्ये ज्या लाभार्थ्यांचे आधार क्रमांक संलग्न करण्यात आले आहेत तेच लाभार्थी अन्नधान्याचा लाभ घेत असल्याची खात्री करण्यासाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील सर्व लाभार्थ्यांची ई-केवासयी करण्याच्या सुचना शासनस्तरावरुन देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या लाभार्थ्यांनी आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची ई-केवायसी करणेसाठी नजीकच्या रास्त भाव धान्य दुकानामार्फत, मोबाईल अप्लिकेशन (मेरा केवायसी) याद्वारे ई-केवायसी पूर्ण करुन घ्यावी. ई-केवायसी न झाल्यास लाभार्थी लाभापासून वंचित राहतील याची नोद घ्यावी अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यातील वसई (१.७१ लाख) डहाणू (१ लाख) व पालघर (१.०३ लाख) या तीन तालुक्यात सर्वाधिक ही केवायसी शिल्लक असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. यामुळे या तालुक्यांमधील प्रशासनाला अधिक प्रमाणात काम करावे लागणार आहे. शिधापत्रक धारकांनी पी केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा तसेच ग्राहक संरक्षण विभागाकडून पालघर जिल्ह्यात विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमे अंतर्गत ठीक ठिकाणी शिबिरांचे आयोजन करून नागरिकाला या प्रक्रियेत समाविष्ट करून घेण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देत असल्याची माहिती पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. लाभार्थ्यांनी आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे ई-केवायसी करण्यासाठी जवळच्या रास्त भाव धान्य दुकानात मध्ये जाऊन अथवा मेरा केवायसी या मोबाईल ॲप्लिकेशन द्वारे ई केवायसी ची पूर्तता करावी असे जिल्हा पुरवठा अधिकारी पी.के ओमासे यांनी आवाहन केले आहे.
मेरा ई केवायसी ॲप ची मदत उपलब्ध
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील सर्व लाभार्थ्यांची ई-केवायसी करण्यासाठी केंद्र सरकारने मेरा ई केवायसी हे मोबाईल ॲप विकसित केले आहे. हे ॲप मोबाईल मध्ये इन्स्टॉल करून स्वतःची व स्वतःच्या कुटुंबातील इतर व्यक्तींची ही केवायसी पूर्ण करणे शक्य आहे. धान्याचा लाभ घेत असलेल्या प्राधान्य कार्डधारक कुटुंबीयांनी तसेच अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थ्यां ना राज्य सरकारने ही केवायसी करणे बंधनकारक केले आहे. रेशन कार्डचे संग्रहित छायाचित्र वापरावे