पालघर जिल्ह्यला जुलै महिन्यात पावसाने झोडपले असून पहिल्या पंधरावडय़ातच तब्बल ११०० मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. या पावसाळ्यात अजून पर्यंत जिल्ह्यत सरासरीच्या ६० टक्के पाऊस नोंदवण्यात आला असून पावसाचा जोर कायम राहिल्यास ऑगस्टच्या मध्यापर्यंत पाऊस सरासरी गाठेल अशी शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जिल्ह्यत १८ जुलै रोजी पर्यंत १३९६ मिलिमीटर पावसाची सरासरी नोंद झाली असून विक्रमगड तालुक्यात सर्वाधिक पाऊस नोंदवण्यात आला आहे. जुलै महिन्यात विRमगड तालुक्यात १४०६, वाडा तालुक्यात १३०९ , जव्हार तालुक्यात ११६०, तलासरी तालुक्यात १०८९, मोखाडा तालुक्यात १०६५, डहाणू तालुक्यात १०३०, वसई तालुक्यात ९९० तर पालघर तालुक्यात ९८७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यचे सरासरी पर्जन्यमान २३०५ मिलिमीटर इतके असून तालुका निहाय सरासरीनुसार डहाणू तालुक्यात ७१ टक्के, विRमगड तालुक्यात ६४ टक्के, तलासरी तालुक्यात ६१ टक्के, वाडा तालुक्यात ५८ टक्के, मोखाडा तालुक्यात ५३ टक्के, वसई तालुक्यात ५२ टक्के, पालघर तालुक्यात ५४ टक्के तर जव्हार तालुक्यात ४८ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

गेला आठवडय़ाच्या तुलनेत पावसाने उघडीप घेतली असून अधूनमधून पावसाच्या सरी सुरू आहेत. भात व नागली पिकांच्या या जिल्ह्यतील प्रमुख खरीप पिकांच्या रोपणीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून शेतीच्या कामांना जोर धरला आहे. गेल्या आठवडय़ात झालेल्या सलग अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी रोप कूजण्याचे प्रकार घडले असून त्या दृष्टिकोनातून कृषी विभागाची सर्वेक्षण करीत आहे.