पालघर तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतीमध्ये तसेच नऊ ठिकाणी होणाऱ्या पोटनिवडणुकीमध्ये ७२ टक्क्यापेक्षा अधिक मतदान होण्याची चिन्ह दिसून  आहेत.जिल्ह्यातील ५१ ग्रामपंचायती मधील थेट सरपंच व ६२८ जागांसाठी निवडणूक होत असताना दोन सरपंचपदी तसेच ४९ जागांसाठी बिनविरोध निवड झाली तर एका गावाने निवडणुकीवर पूर्णतः बहिष्कार टाकला. त्याचप्रमाणे ४९ गावातील ८९ जागांसाठी पोट निवडणूक होत असताना ५६ जागा रिक्त राहिल्या व २४ ठिकाणी बिनविरोध निवड झाल्याने नऊ जागांसाठी पोटनिवडणूक घेण्यात येत होती.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी एक लाख ७१ हजार तर पोटनिवडणुकीसाठी सुमारे ६००० मतदार आपला हक्क बजावणार होते सकाळपासून मतदान केंद्राबाहेर अनेक ठिकाणी गर्दी झाली व दुपारनंतर मतदानासाठी निघणाऱ्यांची संख्या लक्षणीय राहिली. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ५४ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज पुढे आला असून साडे तीन वाजेपर्यंत ६० टक्के पेक्षा अधिक मतदान झाली होती. जिल्ह्यामध्ये सरावली, माहीम, शिरगाव, खैरेपाडे, सालवड, चिंचणी, बोर्डी इत्यादी ठिकाणी प्रतिष्ठेच्या लढती होत असल्याचे दिसून आले. काही किरकोळ प्रकार वगळता मतदान शांततेत संपन्न झाले. काही निवडक मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्यानंतर त्यांची दुरुस्ती अथवा बदलण्यात आल्याचे सांगण्यात आले.

congress government analysis Telangana caste Survey
अन्वयार्थ : जनगणना कधी?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Widow practice, villages , Kolhapur,
कोल्हापुरातील दोन गावात विधवा प्रथा बंद, भेदभावाला मूठमाती देण्याचा ग्रामसभेचा निर्णय
BJP leader manoj tiwari interview
ते ‘रेवड्या’ वाटतात, आम्ही ‘मोफत’ देतो; भाजपा नेते मनोज तिवारींची ‘आप’वर टीका
Ignoring voter growth led to Assembly elections defeat Vishal Patil admits
मतदार वाढीकडे केलेले दुर्लक्ष विधानसभा निवडणुकीत भोवले; विशाल पाटील यांची कबुली
Nalasopara unauthorised building vasai virar municipal corporation
नालासोपाऱ्यातील अनधिकृत इमारतीवर कारवाईला सुरुवात, रहिवाशांचा आक्रोश
Friction between Mahayuti allies intensifies with guardian ministership issue
रायगड जिल्ह्यात महायुतीमधील वाद विकोपाला का गेले? राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये मनोमीलन का नाही?
panvel municipal corporation administration to build primary schools in kamothe and taloja
कामोठे, तळोजात पालिका शाळा; पालकांची अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण होण्याच्या मार्गावर
Story img Loader