डहाणू : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गुजरात कडून मुंबईच्या दिशेला मारुती सुझुकी कंपनीची वाहने घेऊन निघालेल्या कंटेनरला अचानक आग लागल्यामुळे कंटेनरसह आतमधील वाहने जळून मोठा अपघात झाला आहे. वाहनामध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून यामध्ये कोणालाही दुखापत झालेली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आज दुपारी १.३० च्या सुमारास गुजरात वाहिनीवरून मुंबई कडे निघालेल्या कंटेनर क्रं. आर.जे. 47 जी.ए. 4025 या कंटेनर मध्ये विद्युत बिघाडामुळे अचानक आग लागली. चालक शिवराज मीना याने प्रसंगावधान राखत वाहन रस्त्याचा कडेला उभे केले मात्र काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे काही वेळातच कंटेनर आणि आत मधील वाहने जळून खाक झाली आहे.

हेही वाचा… Maharashtra News Live Today : बारसू प्रकल्पाबाबत नेमकं काय म्हणाले आहेत शरद पवार?

दरम्यान घटनेची माहिती मिळताच चारोटी येथील महामार्ग पोलीस आणि कासा पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी वाहनाला लागलेली आग विझवण्यासाठी बोईसर औद्योगिक वसाहत (एम.आई.डी.सी) येथील अग्निशामक दलाला पाचारण केले. अग्निशामक दल घटनास्थळी दाखल होण्यापूर्वीच कंटेनर आणि त्यातील वाहने पूर्णतः जळाल्यामुळे मालकाचे मोठे नुकसान झाले आहे. कंटेनर मध्ये मारुती सुझुकी कंपनीच्या आठ बलेनो कार बाहेर देशात पाठवण्यासाठी जे.एन.पी.टी. बंदरावर नेण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे.

Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A container carrying a car catches fire at mendhwan near dahanu asj
Show comments