बोईसर: तारापूर औद्योगिक वसाहती मधील कार्पेट बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला भीषण आग लागून आत मधील लाखो रुपयांचे कार्पेट आणि कच्चा माल जळून खाक झाला आहे. संध्याकाळी सहा वाजता लागलेली आग तीन तासानंतर देखील आटोक्यात आली नसून तारापूर अग्निशमन दलाचे जवान आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. तारापूर औद्योगिक वसाहती मधील पाम ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या प्लॉट क्र.ए-७५/ए वरील अँटको इंटेरियर प्रायव्हेट लिमिटेड या कार्पेट बनवणाऱ्या कंपनीच्या शेजारी असलेल्या गोदामाला संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत गोदामामधील कार्पेट आणि कार्पेट बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल जळून खाक झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गोदामातील  कच्चामाल हा ज्वलनशील असल्यामुळे आग अधिकच भडकत असून  तीन तासानंतरही आग आटोक्यात आणण्यास अडथळे येत आहेत.  तारापूर  अग्निशमन दलाच्या जवानांकडून तीन तासांपासून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्तीचे प्रयत्न  सुरू आहेत . बोईसर तारापूर एमआयडीसीत कारखान्यांमध्ये आगीच्या वारंवार घटना समोर येत असून या दुर्घटनांकडे एमआयडीसी आणि औद्योगिक सुरक्षा विभाग दुर्लक्ष करत असल्याचे चित्र असल्याने कामगार आणि स्थानिकांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय