पालघर: अलीकडे पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंचांच्या पळवापळवीचे प्रकार थांबत नाही तोच पालघर जिल्ह्यात विविध ठिकाणी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य पळवापळवीचे प्रकार समोर आले आहेत. सत्ता स्थापन करून राजकीय वर्चस्व सिद्ध करण्यासाठी हा प्रकार सुरू असून तशा तक्रारीही पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आल्या आहेत.
पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची, विषय समिती सभापतींची निवडणूक दहा-बारा दिवसांवर येऊन ठेपली आहे. याच बरोबरीने सर्व पंचायत समित्या यांचे सभापती व उपसभापती यांचीही निवडणूक आहे. त्यामुळे राज्यातील सत्ताधारी पक्षाचे पालघर जिल्ह्यातील कार्यकर्ते या सर्व सदस्यांना या ना त्या प्रकारे आपल्याकडे वळवण्यासाठी पराकाष्टा करताना दिसत आहेत.
जिल्हा परिषदेसह इतर पंचायत समित्या काबीज करण्यासाठी जोरदार राजकारण सुरू असून सदस्य फोडाफोडीच्या प्रकारामुळे सध्या जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. काही ठिकाणी सदस्य वर्ग आपल्याकडे वळवून घेण्यासाठी पैशांची मोठी रसद पुरवली जात असल्याची चर्चा आहे. सध्या सदस्य वर्गासोबत चर्चा करून सदस्यांची पत ठरवली जात आहे व त्यांना रसदेचे आमिष दाखवून आपल्याकडे आणण्याचा जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे म्हटले जात आहे.
चार सदस्य बेपत्ता?
शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या सध्याच्या जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मार्ग पत्करला आहे. त्यानंतर काही दिवसांपूर्वी पालघर जिल्हा परिषदेतील ठाकरे गटाचे दहा ते अकरा सदस्य शिंदे गटात गेल्याचे सांगितले जाते. मात्र त्यानंतरही जिल्हा परिषदेमध्ये इतर पक्षांच्या सोबतीने ठाकरे गटाची शिवसेना सत्तेत येईल, असे चित्र असल्यामुळे ठाकरे गटातील सदस्यांच्या फोडाफोडीचे राजकारण सध्या पालघरमध्ये जोर धरत आहे. चार जिल्हा परिषद सदस्य तीन चार दिवसांपासून बेपत्ता आहेत, अशी माहिती समोर येते. त्यातील एका सदस्याच्या नातेवाईकांनी सदस्य बेपत्ता असल्याची पोलीस ठाण्यात तक्रारही केली आहे.