नीरज राऊत
पालघर: प्राचीन आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या वारली चित्रकलेचे प्रतिबिंब आंतरराष्ट्रीय पटलावर उमटले आहे. पारंपारिक भाषेमध्ये लेखन झालेल्या चित्ररुपी कथांचे इंग्रजीमध्ये अनुवाद झाल्याने अशा पुस्तकाला जगभरातून मागणी वाढत आहे. पालघर जिल्ह्यतील काही आदिवासी चित्रकार या कार्यात अग्रेसर असून नवीन पुस्तकांचे मुद्रण करण्यासाठी वाटचाल सुरू आहे
पालघर तालुक्यातील मनोर (कोंढाण) येथे राहणारम्य़ा मधुकर रामभाऊ वाडू (५४) यांनी जर्मन भाषेचा अभ्यास करून वारली दंतकथा तसेच वारली चित्रांचा अर्थ बोध सांगणारम्य़ा कथांचे जर्मन भाषेत लिखाण केले आहे. त्यांना वारली चित्रकलेचा अभ्यास असणारम्य़ा सिग्ने रुत्तजगर्स यांनी या कथांचे संपादन करण्यास मदत केली आहे. त्या कथांवर आधारित सन २००३ मध्ये ‘अंडर द रेनबो’ हे ३६ पानी पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. या पुस्तकाला मिळालेल्या प्रतिसादानंतर ८१ पानांची सुधारित दुसरी आवृत्ती सन २००६ मध्ये प्रकाशित करण्यात आली. १३ युरो किमतीला (भारतीय बाजारपेठेतील किंमत सुमारे एक हजार) विकल्या जाणारम्य़ा पुस्तकाचे मानधन (रॉयल्टी) अजूनही मधुकर यांना मिळत आहे.
मधुकर वाडू यांनी त्यांचे दुसरे पुस्तक २०१८ मध्ये ‘द मिस्टिकल वर्ल्ड ऑफ वारलीस’ हे चेन्नई येथील प्रकाशकाच्या मदतीने चिकू महोत्सवाच्या दरम्यान बोर्डी येथे प्रकाशित केले होते. हे पुस्तक अॅमेझॉन फ्लिपकार्ट व इतर संकेत स्थळांवर उपलब्ध आहे. या पुस्तकाला देशातून तसेच परदेशातून मागणी वाढत असल्याचे सांगण्यात येते.
मधुकर वाडू यांनी वारली संस्कृती संदर्भात अनेक कथा लिहिल्या आहेत. त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी डहाणू येथील सामाजिक कार्यकर्त्यां व इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज या संस्थेच्या संयोजिका फिरोजा ताप्ती मदत करीत आहेत. पालघर जिल्ह्यत अनेक वारली चित्रकार आहेत. त्यांचे प्रदर्शन देशात तसेच परदेशात विविध ठिकाणी होत असतात. वारली चित्रांना दंतकथा आणि परंपरेच्या माहितीची जोड मिळण्यासाठी चित्रकारांना बोलते करणे तसेच त्यांच्या चित्रामागील अर्थ कथा स्वरूपात मांडण्यासाठी विशेष प्रशिक्षणाची गरज असल्याचे फिरोजा ताप्ती यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. स्थानीय पातळीवर वारली चित्रकलेवर अनेक पुस्तक प्रकाशित झाली असली तरीही त्यांचे अनुवाद न झाल्याने त्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर अजूनही मागणी आलेली नाही, म्हटले जात आहे.
कथारुपी चित्रकला
वारली चित्रकलांमधून विविध अर्थबोधातात्मक कथा साकारल्या जात असतात. त्यामध्ये मानवाची निर्मिती, निसर्गपूजन, पृथ्वीवरील वनस्पती, धान्य झाडांचे देवी रूपाने पूजन व सन्मान, काल्पनिक गोष्टी, मानवाची उत्पत्ती, मानवाचे कर्तव्य, मानवी दशेतील विविध अंग, जीवनशैली यांच्यासह दगडी देवांच्या पूजेचा इतिहास, सण-लग्नसराई, जन्म मृत्यू कार्य, कल्पना व स्वप्न, नातीगोती व जिव्हाळा आदी विषयांचा समावेश असतो.
वायडा बंधुंचेही पुस्तक
गंजाड (डहाणू) येथील मयूर व तुषार वायडा या बंधूंनी जपान येथील एका सेवाभावी संस्थांशी संस्कृती आदान प्रदान उपRमात सहभाग घेतला होता. जपान येथील वासहिमा या बेटावर सहा महिने वास्तव्य केल्यानंतर तेथील निसर्गरम्य वातावरणात व वारली कलेवर आधारित लिहिलेले त्यांच्या ‘द डीप’ नामक पुस्तकाचे प्रकाशन सप्टेंबर २०२० मध्ये झाले. या पुस्तकाला देखील उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.