पालघर शहरात सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पामुळे तसेच शहराजवळ सुरू असलेल्या राष्ट्रीय प्रकल्पांमुळे पालघर शहरातील हवा गुणवत्ता निर्देशांकामध्ये वाढ झाली असून त्यामुळे अनेक नागरिकांना दमा तसेच श्वसनाशी संबंधित आजारांमध्ये वाढ झाली आहे. विशेष म्हणजे हवेची गुणवत्ता राखण्यासाठी कोणतीही शासकीय यंत्रणा गांभीर्याने लक्ष देत नसून प्रदूषित हवेमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

अनेक नागरिकांना व विशेषतः वयोवृद्ध व बालकांना अचानकपणे खोकला होणे व त्यानंतर दम्याचा आजार असल्याचे निदान झाल्याचे दिसून आले असून वातावरणामध्ये झालेले बदल, तापमानामध्ये झालेली घट तसेच हवेमध्ये धूळ व धुळकण यांचे वाढलेले लक्षणीय प्रमाण कारणीभूत असल्याचे बालरोग तज्ञ तसेच शहरातील डॉक्टरांचे मत आहे.

air pollution in Mumbai news
मुंबईची हवा पुन्हा प्रदूषित; कुलाबा, कांदिवली येथे ‘वाईट’ हवेची नोंद
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Graded Response Action Plan project to monitor air pollution Pune news
पिंपरी: हवा प्रदूषणावर आता ‘ग्रॅप’ची नजर; प्रदूषण करणारे उद्योग…
parks in navi mumbai city in worse condition
उद्याने बकाल; सुरक्षा धोक्यात; महानगरपालिकेच्या अनास्थेमुळे नवी मुंबई शहरातील उद्यानांची दुरवस्था
badlapur east gas spread loksatta news
बदलापूर पूर्वेत पसरला रासायनिक वायू; रहिवाशांना डोळे चुरचुरणे, श्वसनाचा त्रास, वायूगळतीचा संशय
Thane , government projects, dust, health,
सरकारी प्रकल्पांमुळेच धुळधाण, नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता
mazgaon bkc among most polluted areas due to nitrogen dioxide levels increase
माझगाव, वांद्रे-कुर्ला संकुल सर्वाधिक प्रदूषित; नायट्रोजन डायऑक्साइडच्या पातळीत वाढ
house damaged by falling tree branch in goregaon
गोरेगावमधील झाडाची फांदी पडून घराचे नुकसान

हेही वाचा >>> डहाणू नगर परिषदेच्या हद्दीत असणाऱ्या आंबेडकर नगर मधील सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था

पालघर शहरात अनेक गृहसंकुल उभारण्याचे प्रकल्प सुरू असून त्या ठिकाणी धूळकण किंवा धुळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कोणतीही उपाययोजना आखण्यात आलेली नाही. याकडे पालघर नगरपरिषद अथवा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असून अनेकदा बांधकाम कर्मचारी मुक्तपणे धूळ व धूळ युक्त कचऱ्याची उधळण करताना दिसून येतात. रेती, वाळू अथवा बांधकामात हवेत मिसळण्याजोग्या पदार्थांवर पाणी शिंपडण्याचे प्रयत्न देखील होत नसल्याने मुंबई महानगर क्षेत्रात झालेल्या हवेच्या गुणवत्ता निर्देशांक मधील वाढ व त्या संदर्भात उच्च न्यायालयाने घेतलेली दखल या संदर्भात सर्व संबंधित घटक अभिज्ञ असल्याप्रमाणे वागत आहेत. विशेष म्हणजे सध्या पहाटे व सकाळी काही प्रमाणात दव व धुके पडत असून सकाळी चालण्यासाठी निघणाऱ्या नागरिकांना देखील प्रदूषित वातावरणाचा फटका बसत असल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा >>> पालघर : अंगणवाडी केंद्र बंद असल्यामुळे लाभार्थी पोषण आहारापासून वंचित

यासंदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी विरेंद्र सिंग यांच्याशी संपर्क साधला असता जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या क्षेत्रात सुरू असलेल्या बांधकामांचा तपशील तसेच हवेतील प्रदूषण रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजना यासंदर्भात माहिती मागवली असल्याचे सांगितले. ज्या मोठ्या प्रकल्पाला पर्यावरणीय परवानगीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी हवेच्या दर्जा राखण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यरत राहणार असून अन्य ठिकाणी बांधकाम प्रकल्पांना परवानगी देणारी स्थानिक स्वराज्य संस्थेने लक्ष द्यावे असे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे म्हणणे आहे. केंद्र सरकारकडून राबवण्यात येणारा ‘क्लीन एअर प्रोग्राम’ अर्थात स्वच्छ हवा प्रकल्प हा महानगरपालिका क्षेत्रात राबवला जात असून नगरपरिषदांसाठी हवेतील गुणवत्ता राखण्यासाठी केंद्र शासन अथवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा कोणताही निधी अथवा योजना उपलब्ध नसल्याचे नगरपरिषद विभागाचे सहायुक्त डॉ. पंकज पवार यांनी सांगितले. विविध शहरांमध्ये सुरू असलेल्या बांधकामांमध्ये हवेतील प्रदूषण रोखण्यासाठी सूचना देण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.

पालघरवासी प्रदूषणाने त्रस्त

हवेमधील धुळकणचे प्रमाण वाढल्याने श्वसनाच्या विकारांसोबत पालघर शहरालगत असणाऱ्या औद्योगिक वसाहती मधून सायंकाळी व रात्रीच्या वेळी दुर्गंधी असणारा प्रदूषित वायू नियमितपणे सोडण्यात येतो. त्यामुळे रात्री झोपेत अथवा पहाटे दुर्गंधीमुळे येथील नागरिक त्रस्त असून त्याविरुद्ध प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे अनेकदा तक्रार नोंदवून देखील कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे.

पालघर शहरात सर्व वयोगटातील नागरिकांमध्ये श्वसनाचे विकार गेल्या काही महिन्यांपासून वाढले असून त्याला हवेमधील धुळकणांचे वाढलेले प्रमाण बहुतांशी कारणीभूत आहे. पालघर शहरातील हवेची गुणवत्ता राखण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक झाले आहे. – डॉ. विक्रांत पाटकर, खाजगी फॅमिली फिजिशियन

Story img Loader