कुणाल लाडे/ नीरज राऊत

आदिवासीबहुल पालघर जिल्ह्यातील आदिवासींना विविध प्रलोभने दाखवून धर्मातर करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. तसेच वेगवेगळय़ा अंधश्रद्धा पसरवून त्या माध्यमातून त्यांची दिशाभूल केली जात आहे. अलीकडेच तलासरी येथील ग्रामीण रुग्णालयात सर्पदंश झालेल्या एका रुग्णावर एका समाजाच्या प्रचारकाने रुग्णाला बरे करण्यासाठी केलेले प्रकार मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाल्याने हा प्रकार उघडकीस आला. असे अनेक प्रकार जिल्ह्यात राजरोसपणे सुरू असल्याचे माहिती पुढे येत आहे. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अस्तित्वात येऊन अनेक वर्षे झाली असली तरीही अशा प्रकारांना आळा घालण्यास प्रशासन अपयशी ठरले आहे.

Sadanand literary conference
सांगली: जात घट्ट कराल तसा माणूस पातळ होईल; लवटे
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Fire , Natasha Enclave Society, Kondhwa,
पुणे : कोंढव्यातील नताशा एनक्लेव्ह सोसायटीत आग, रहिवासी बाहेर पडल्याने बचावले
tulja bhavani shakambhari navratrotsav loksatta news
शाकंभरी नवरात्र महोत्सव : सहाव्या माळेला महिषासूरमर्दिनी अलंकार महापूजा
buldhana couple murder loksatta news
बुलढाणा : नातेवाईकांच्या भेटी घेतल्या, पण निरोप घेतला तो कायमचा; वृद्ध दाम्पत्याचा…
Massive fire breaks out in Kurla news in marathi
कुर्ल्यातील उपाहारगृहात भीषण आग
Committee to investigate Eklavya School case takes note of student protest
एकलव्य शाळेतील प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती, विद्यार्थी आंदोलनाची दखल
Foreign varieties on the root of Shrivardhan Rotha betel nut
परराज्यातील वाण श्रीवर्धनच्या रोठा सुपारीच्या मुळावर?

आदिवासींना पैसे, धान्य, कपडे व इतर वस्तूंची प्रलोभने दाखवून धर्मातर करण्यासाठी जिल्ह्यात व विशेषत: ग्रामीण भागात अनेक ठिकाणी प्रयत्न केले जात आहेत. धर्माचा प्रसार करण्यासाठी दर शुक्रवारी अथवा रविवारी प्रार्थना सभांचे आयोजन केले जाते. त्याचप्रमाणे धर्मप्रसाराचे साहित्य वाटप देखील उघडपणे केले जात आहे. त्यापलीकडे जाऊन अशा धर्माच्या सभांमध्ये तंत्र मंत्रसारख्या कृती दाखवून यशस्वी उपचार केलाचा दावा केला जात आहे. अनेक ठिकाणी मंतरलेले पाणी देऊन कर्करोग व इतर दुर्धर आजार बरे होतील, असे भाबडय़ा जनतेला आश्वासित केले जाते.

हेही वाचा >>> बचत गटाला स्वावलंबी बनवण्यासाठी इंग्रजी शिक्षणाचा अभिनव प्रयोग

२०१४ मध्ये पालघरजवळील नंडोरे येथील एका गावातील आदिवासी बांधवांना इस्राईल येथे घेऊन जाऊ, असे आमिष दाखवण्यात आले होते. त्यावेळी अनेक कुटुंबांनी धर्मातर केले होते तसेच आपली मालमत्ता, जागा कवडीमोल दराने विकली होती. नंतर हा प्रकार फसवणुकीचा असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर देखील आमिष दाखविणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही.

देशभरात करोना संक्रमण मोठय़ा प्रमाणात सुरू असताना सरकारने नागरिकांसाठी लसीकरण मोहीम हाती घेतली होती. त्यावेळी विशिष्ट समाजाच्या प्रभावाखाली असणाऱ्या मंडळींनी या लसीकरणापासून दूर राहणे पसंत केले. परिणामी त्यांच्यापैकी करोनाची लागण झालेल्या अनेकांचा मृत्यू झाल्याचे प्रकार पुढे आले आहेत.

निसर्ग पूजक असणाऱ्या आदिवासी बांधवांना धर्मप्रसारक गाठून त्यांना वेगवेगळय़ा प्रकारे प्रलोभन देऊन प्रार्थना स्थळावर आठवडय़ातून ठरलेल्या वारी नियमितपणे येण्यासाठी आग्रह धरतात. या बांधवांना विशिष्ट धर्माची शिकवण देऊन पारंपरिक सण उत्सव साजरा न करण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे अशा सण उत्सवाच्या दरम्यान तणावाचे वातावरण निर्माण होताना दिसते.

हेही वाचा >>> पालघरमधील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत; भातशेतीवर कीटकांचा प्रादुर्भाव

जिल्ह्यात अनेक ठिकाणी धर्मप्रसाराचे छुपे उद्दिष्ट समोर ठेवून प्रार्थनास्थळे उभारण्यात आली आहेत. अशा प्रार्थनास्थळांना शासनाची पूर्व परवानगी घेणे आवश्यक असताना बहुतांश प्रार्थना स्थळांकडे कोणत्याही प्रकारची परवानगी नसल्याचे दिसून आले आहे. मात्र अल्पसंख्याक असल्याचे कारण पुढे केले जात असल्याने पोलीस तसेच प्रशासन त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी धाडस दाखवत नाही, अशी पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात परिस्थिती आहे. धर्मातर केलेल्या आदिवासी बांधवांना अनुसूचित जमातीचे लाभ दिले जाऊ नयेत, अशी भावना पुढे येत आहे. त्यामुळे असे अंधश्रद्धा पसरवण्याची व कालांतराने धर्मातर करण्याचे प्रकार न रोखल्यास जिल्ह्यात या मुद्दय़ावर आगामी काळात तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे.

प्रशासनासमोर अडचणी

अंधश्रद्धा निर्मूलन समिती अनेक ठिकाणी जनजागृती करण्याचे प्रयत्न करीत आहे. तसेच धर्मातर झालेल्यांना पुन्हा मूळ धर्मात स्वीकारण्यासाठी अनेक पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. पोलिसांनी जनसंवाद अभियानाच्या माध्यमातून अंधश्रद्धेचा प्रसार रोखण्यासाठी गावोगावी जनजागृती केली आहे. जादूटोणा किंवा अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार प्राप्त झाली तर कारवाई करण्याचे तयारी पोलिसांनी दर्शवली असली तरीही अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कोणी पुढे येत नसल्याने प्रशासनासमोर अडचणी निर्माण होत आहेत.

Story img Loader