वसई/ पालघर: शिट्टी चिन्ह बहुजन विकास आघाडीला देण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायलयाने सोमवारी सकाळी दिला. यामुळे पक्षाला मोठा दिलासा मिळाला असून पालघर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी शिट्टी चिन्ह परत मिळाल्याने जल्लोष साजरा केला.

पालघर जिल्ह्यात बहुजन विकास आघाडीचे ३ आमदार असून पक्षाचे ‘शिट्टी’’ हे पारंपरिक चिन्ह आहे. निवडणूक आयोगाने ३० जानेवारी २०२४ रोजी ‘शिट्टी’ हे चिन्ह जनता दल (युनायटेड) या पक्षासाठी राखीव ठेवले होते. मात्र त्यानंतर २३ मार्च २०२४ रोजी भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या नवीन अधिसूचनेत ‘शिट्टी’ हे चिन्ह मुक्त चिन्हांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले होते. त्यामुळे अनेक अपक्ष उमेदवारांनी ‘शिट्टी’ या चिन्हाची मागणी केली होती. निवडणूक आयोगाच्या दोन निर्णयामुळे हा गोंधळ निर्माण झाला होता आणि बविआच्या हातून शिट्टी निसटण्याची शक्यता निर्माण झाली होती. यासंदर्भात ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेऊन बहुजन विकास आघाडीने उच्च न्यायालयात दाद मागितली होती. या याचिकेत बहुजन विकास आघाडीने निवडणूक आयोगाचे ३० जानेवारीचे पत्र व त्यामुळे झालेल्या परिणामांबाबत हरकत घेतली होती आहे.

ECI on Hitendra Thakur Party Symbol Whistle in Marathi
Hitendra Thakur Party Symbol : हितेंद्र ठाकूर यांची ‘शिट्टी’ गायब !
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Vikramgad Assembly, Vikramgad Assembly Shivsena Rebellion,
पालघर : विक्रमगड विधानसभेतील शिवसेना बंडखोरीमुळे पालघरमधील महायुतीत वादाची ठिणगी
bva appealed to High Court after Election Commission of India reserved whistle symbol for janata Dal United
शिटी साठी बविआ ची उच्च न्यायालयात धाव
NCP Clock
NCP Clock Symbol : ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांना आदेश; पक्षचिन्हाबाबत दिला ३६ तासांचा अल्टिमेटम!
whistle symbol open for bahujan vikas aghadi as well as for other in maharashtra assembly elections
विधानसभा निवडणुकीसाठी शिट्टी झाले खुले चिन्ह; बहुजन विकास आघाडी सह इतर अपेक्षांना शिट्टी चिन्ह मिळू शकणार
Palghar MLA Shrinivas Vanga return
Shrinivas Vanga: ‘आधी रडले, ठाकरेंना देव म्हणाले’, घरी परतल्यावर आमदार श्रीनिवास वनगांचे सूर बदलले; म्हणाले, “एकनाथ शिंदे…”
Sada Sarvankar
Sada Sarvankar : “मला निवडणूक लढवावीच लागेल”, सदा सरवणकर हतबल; म्हणाले, “राज ठाकरेंनी माझी…”

हेही वाचा – पालघर : बोईसरमध्ये अज्ञात वस्तूचा स्फोट; चार जण जखमी

उच्च न्यायालयाचा बविआला दिलासा

बविआने न्यायालयात धाव घेतली असताना पक्षासाठी आणखी एक दिलासादायक बाब घडली होती. जनता दल (युनायटेड) चे राष्ट्रीय सचिव मोहम्मद निसार यांनी रविवार ३ नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाला पत्र लिहून महाराष्ट्रात निवडणूक लढविणार नसल्याने शिट्टी चिन्ह परत करणार असल्याचे सांगितले होते. हे पत्र बविआसाठी महत्वपूर्ण ठरले. सोमवारी ४ नोव्हेंबर ( दुपारी ३ पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असल्याने या विषयाचे गांभीर्य पाहून उच्च न्यायालयाने सोमवारी सकाळी तातडीने या याचिकेची सुनावणी घेतली. या याचिकेवर निर्णय देताना न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर आणि सोमशेखर सुंदरसन यांच्या खंडपिठाने शिट्टी चिन्ह बविआला देण्याची पूर्तता करण्याचा आदेश दिला. भारत निवडणूक आयोगातर्फे हजर वकिलांनी बविआने शिट्टी हे चिन्ह मागितल्याने कायद्याच्या कक्षात राहून त्यांना देण्यात येईल असे न्यायलयाला सांगितले.

हेही वाचा – तलासरी पोलीस ठाणे हद्दीत ४ कोटी ३३ लाख कोटींची रक्कम जप्त

वसई विरारमध्ये जल्लोष

वसई विरार हा बविआचा बालेकिल्ला आहे. सोमवारी सकाळी उच्च न्यायालय काय निर्णय देतो त्याकडे पक्षाचे लक्ष लागले होते. रविवारी जनता दल (युनायटेड) ने शिट्टी चिन्ह परत करण्याचा निर्णय घेतल्याने पक्षाला आशा निर्माण झाली होती. सार्‍या नजरा उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे लागल्या होत्या. अखेर सोमवारी सकाळी उच्च न्यायालयाचा निर्णय येताच कार्यकर्ते फटाके फोडून तसेच समाजमाध्यमावर शिट्टी चिन्ह झळकवून आनंद साजरा करत होते.

Story img Loader