कल्याण व ठाणे लोकसभा मतदारसंघ पाठोपाठ भाजपाने पालघर लोकसभा मतदार केंद्रावर आपले लक्ष केंद्रित केले असून १० हजार पेक्षा अधिक कार्यकर्त्यांचे शक्ती प्रदर्शन करून पालघरच्या लोकसभा जागेवर दावा करण्याचा प्रयत्न केला आहे.

मोदी सरकारच्या नऊ वर्षाच्या कारकिर्दीच्या अनुषंगाने महा जनसंपर्क अभियान अंतर्गत पालघर येथे जाहीर सभेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला केंद्रीय प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर, पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण व भाजपाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

shiv sena bjp conflict over regularizing construction built by project victims in navi mumbai and panvel
प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर नवी मुंबईत महायुतीतच धुसफुस ?
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
congress chief mallikarjun kharge slams pm narendra modi over manipur violence
मणिपूरमध्ये पंतप्रधानांचे अपयश निंदनीय; काँग्रेसची केंद्र सरकारवर टीका
Vijay Wadettiwar, Congress MP, Chandrapur,
वडेट्टीवार यांना पराभूत करा, कॉंग्रेस खासदाराचे अप्रत्यक्ष आवाहन
Administrative approval for road works affected by heavy rain Funding in Vikramgarh Assembly Constituency Palghar
पालघर: पाऊस सर्वत्र मात्र अतिवृष्टी विक्रमगड विधानसभा क्षेत्रातच !
Extension of time to Ravindra Waikar to clarify his position on Amol Kirtikar petition print politics news
कीर्तिकरांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्यासाठी वायकर यांना मुदतवाढ
Rajendra Gavit, Palghar Assembly Constituency,
राजेंद्र गावित पालघरसाठी आग्रही
book Diary of Home Minister
सावधान ! अनिल देशमुख यांचे पुस्तक येत आहे, निवडणुकीपूर्वी येणार मोठे राजकीय वादळ

नरेंद्र मोदी यांनी केलेल्या लोकपयोगी कामांचा आढावा घेत कार्यकर्त्यांनी लाभार्थ्यांना दिलेल्या लाभांची आठवण उजळणी करून देणे आवश्यक असल्याचे रवींद्र चव्हाण यांनी भाजप कार्यकर्त्यांना सुचित केले. लोकसभेत भाजपाला ४०० पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवून नरेंद्र मोदी यांना २०२४ मध्ये पुन्हा निवडून द्यावयाचे असल्याचे सांगत पालघरची खासदारकी जिंकणे आवश्यक असल्याचा सूचक संदेश दिला. जिल्ह्यातील रस्त्याची जाळे उभारण्याचे तसेच ग्रामीण भागात वायरलेस इंटरनेट सुविधा पुरवण्याच्या प्रकल्प राबविण्यात येईल असे त्यांनी आश्वासित केले.

केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी नऊ वर्षातील कारकिदेतील विविध लोक उपयोगी योजनांचा आढावा घेतला तथा या कार्यक्रमाला भाजप कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले.

सध्या पालघर लोकसभा ही शिवसेनेकडे असून मोदी @9 या कार्यक्रमानंतर या पालघरच्या लोकसभा जागेवर भाजप दावा करणार का या प्रश्नावर उत्तर देताना पालघर लोकसभा शिवसेनेकडे असली तरी कोणता पक्ष कुठे निवडणूक लढवणार हे २०२४ ला निश्चित होणार आणि जर वाटाघाटीत ही जागा शिवसेनेकडे गेली तर आम्ही एनडीए चा मित्र पक्ष म्हणून शिवसेनेच्या पूर्ण पाठीशी राहणार असल्याचं यावेळी अनुराग ठाकूर म्हणाले.

नरेंद्र मोदी देशाचे सर्वोच्च नेते आहेत त्यामुळे त्यांनी दक्षिणेतून काय की उत्तरेतून काय कुठेही निवडणूक लढवली तरी जनता त्यांच्याच पाठीशी उभी राहणार अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी नरेंद्र मोदी दक्षिणेतून निवडणूक लढवणार का या प्रश्नावर दिली.

दिल्लीत दोन मस्तानी आणि महाराष्ट्रात दोन मस्तानी आहेत अशी टीका संजय राऊत यांनी केली होती यावर प्रतिक्रिया देताना काही लोकांना काही कामधंदे नाही त्यामुळे काम करणाऱ्यांवर टीका करून टीआरपी मध्ये राहायचं हाच त्यांचा उद्योग अशी खोचक टीका अनुराग ठाकूर यांची संजय राऊत यांच्यावर केली .