लोकसत्ता प्रतिनिधी

पालघर: विकास कामाचे बिल देण्यावरून भाजपा प्रेरित उपसरपंच तसेच भाजपाचे नेते यांच्यात वाद उफळल्याने दांडी ग्रामपंचायत कार्यालयात काल (मंगळवार) सायंकाळी तुफान हाणामारी होऊन ग्रामपंचायतच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. या प्रकरणात २१ जणांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असून या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

dcm ajit pawar warning pimpri chinchwad police over liquor sale prostitution in alandi
आळंदीतील मद्यविक्री, वेश्याव्यवसाय बंद न झाल्यास पोलिसांवर कारवाई; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Due to hunger strike of sugarcane growers problems of Congress leaders siddharam mhetre have increased
ऊस उत्पादकांच्या उपोषणामुळे काँग्रेस नेते म्हेत्रेंच्या अडचणीत वाढ
Case against former Shiv Sena corporator Mohan Ugle in Kalyan
कल्याणमधील शिवसेनेचे माजी नगरसेवक मोहन उगले यांच्यावर गुन्हा
fresh attack in manipur
Manipur Violence : वृद्ध नागरिकाच्या हत्येनंतर मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचाराची घटना; दोन सशस्र गटातील गोळीबारात पाच जणांचा मृत्यू
Pune Rural Superintendent, Sandeep Singh Gill,
ग्रामीण अधीक्षकपदी संदीपसिंग गिल; पंकज देशमुख यांची बृहन्मुंबई येथे उपायुक्त म्हणून नियुक्ती
arrival procession of Lord ganesha in kalyan and dombivli create traffic issue in city
कल्याण-डोंबिवलीत गणेशोत्सव मंडळांच्या मनमानीने प्रवासी हैराण
एसटी प्रवाशांचा खोळंबा; गणेशोत्सवाच्या तोंडावर कर्मचाऱ्यांचे आंदोलन, संपामुळे २५१ पैकी ५९ आगारांचे कामकाज ठप्प

गावातील एका विकास काम उपसरपंच यांचे नातेवाईक तसेच अन्य एका भाजप कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे केल्यानंतर या कामाचे बिल कोणी सादर करावे यावरून वाद निर्माण झाला होता. त्यावरून महिला उपसरपंच नमिता तामोरे तसेच भाजपाचे नेते विजय तामोरे यांनी काल सायंकाळी ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयात अनौपचारिक बैठक आयोजित केली होती.

आणखी वाचा-शिक्षकांचा घरभाडे भत्ता रद्दच मुख्यालयाच्या ठिकाणी न राहणाऱ्या शिक्षकांना धक्का

या बिलासंदर्भात गरमागरणीच्या वातावरणात चर्चा सुरु असताना दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी होऊन किमान सहा लोक जखमी झाले आहेत. यामध्ये दोन्ही बाजूच्या समर्थकांनी ग्रामपंचायतच्या खुर्च्यांची एकमेकांवर आदळ आपट आणि मोडतोड केली तसेच ग्रामपंचायतच्या इतर मालमत्तेचे देखील नुकसान झाल्याचे दिसून आले आहे.

या प्रकरणात दोन्ही गटांच्या २१ सदस्यांविरुद्ध हाणामारी तसेच दंगा करण्याचे आरोप झाले असून या सर्वांना सातपाटी सागरी पोलीस स्टेशन मध्ये ताब्यात घेण्यात येत आहे. या प्रकरणात पोलिसांनी सरकारी कामात अडथळा कलमानुसार कारवाई करण्याची मागणी इतर राजकीय पक्षांनी केली आहेत. दांडी गावातील एका विशिष्ट गटाची असलेली दहशत मोडून काढण्यासाठी पोलिसांनी निःपक्ष कारवाई करण्याची मागणी पुढे येत आहे.