मुंबई येथून हजेऱ्याकडे निघालेल्या मालवाहू जहाजाच्या इंजिन मध्ये बिघाड झाल्याने हे जहाज पालघर तालुक्यातील वडराई किनाऱ्याजवळ नांगरण्यात आले आहे. “सी सिद्धी” हे रिकामी जहाज परतीच्या प्रवासावर असून बिघाड दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. समुद्रकिनाऱ्यापासून सुमारे अर्धा नॉटिकल मैलावर आज दुपारी एक अनोळखी जहाज तरंगत असल्याचे दिसून आले.

हेही वाचा >>> पालघर: दुप्पट किमतींच्या नोटा देण्याचे आमिष दाखवणाऱ्या तोतया पोलिसाला अटक

Youth murder, hotspot, Hadapsar area,
पुणे : मोबाइलमधील हॉटस्पॉट यंत्रणेचा वापर करण्यास नकार दिल्याने तरुणाचा खून, हडपसर भागातील घटना
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
Ratnagiri,Fishing Boat Sinks in Purnagad Sea, Purnagad sea, fishing boat, Coast Guard, rescue, strong winds, rough sea,
रत्नागिरी : पूर्णगड समुद्रात मासेमारी करणारी नौका खराब वातावरणामुळे बुडाली, दोघा खलाश्यांना वाचवण्यात तटरक्षक दलाला यश
Wardha, state government schemes,ladki bahin yojana, utensil distribution, construction workers, political pressure, Hinganghat taluka, Deoli taluka, Sena Thackeray group, chaos, administration,
वर्धा : बहिणी लाडक्या मतदार नसल्याने वंचित, भांडी न मिळाल्याने हिरमुसल्या
A cage has been set up to imprison leopards at Dhagae Vasti Pune print news
ढगे वस्ती येथे बिबट्यास जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे; विबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी
gym trainer, Kalyan, bandhara,
कल्याणमधील जीम ट्रेनर तरुण शहापूरजवळील बंधाऱ्यात बेपत्ता
delivery boy was killed in a dispute over a raincoat Pune news
रेनकोटवरून झालेल्या वादातून घरपोहोच खाद्यपदार्थ पोहोचविणाऱ्या तरुणाचा खून- सिंहगड रस्ता परिसरातील घटना
civil facilities delhi
दिल्लीत यंदाच्या पावसाळ्यात नागरी सुविधा पूर्णपणे ठप्प

याबाबत चौकशी केल्यानंतर २३ जुलै रोजी पहाटे तीन वाजून २४ मिनिटांनी मुंबई बंदरातून हजीऱ्याकडे निघालेले या जहाजाच्या इंजिन मध्ये बिघाड झाल्याने आज दुपारी एक वाजल्याच्या सुमारास वडराई किनाऱ्याजवळ हे जहाज नांगरण्यात आले. २६१५ मॅट्रिक टन माल वाहण्याची क्षमता असणारे हे जहाजाची लांबी ७९.७९ मीटर व रुंदी १५.४ मीटर इतकी असून यावरील सर्व १२ खराशी सुखरूप असल्याचे सांगण्यात आले. हे जहाज २४ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता हजीरा येथे पोहोचणे अपेक्षित होते. सध्या या जहाजा च्या इंजिन ची दुरुस्ती हाती घेण्यात आली असून या जहाजाला आवश्यकता भासल्यास खेचून (टग) करून नेण्यासाठी दुसऱ्या अन्य जहाजाला पाचारण करण्यात येईल असे सांगण्यात आले. खवळलेल्या समुद्रात तसेच वादळी वाऱ्यमुळे हे जहाज बुडू नये म्हणून विविध शासकीय यंत्रणा समन्वय साधत असल्याचे सांगण्यात आले.