पालघर: गांधीनगर ते मुंबई सेंट्रल दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसने उंबरगाव व घोलवड तालुका दरम्यान गुरांच्या कळपाला धडक दिल्याचा प्रकार घडला. या प्रकारात गाडीचे विशेष नुकसान झाले नसल्याचे पश्चिम रेल्वे सांगितले आहे. सायंकाळी सात वाजून पाच मिनिटांच्या सुमारास मुंबईकडे वंदे भारत एक्सप्रेस ने गुरांच्या कळपाला धडक दिली. सुमारे सात मिनिटं गाडी अपघात स्थळी थांबल्यानंतर नंतर पुढील प्रवासाकडे निघाली असे पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क अधिकारी यांनी सांगितले आहे. वंदे भाव मार्गांवर सुरक्षा रेलिंग उभारण्याचे काम हाती घेण्यात आले असून या पट्ट्यामध्ये ३७८ मीटर लांबी चित्रावर हे संरक्षण उभारणे प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले.

Story img Loader