पालघर : पालघर जिल्ह्यातील खोमारपाडा (विक्रमगड) गावातील १०८ कुटुंबीयांचे रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबवून चार- पाच वर्षांत लखपती कुटुंबं झाली आहेत. मनरेगा योजनेतील उपक्रम इतर विभागाच्या सहकार्याने गावातील प्रत्येक कुटुंबाने समृद्धीकडे वाटचाल केली असून गावातील पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण व आर्थिक स्थर उंचाविला आहे. या नंदादीप समृद्ध गावाने आदर्श निर्माण करून इतरांसाठी दिशादर्शक ठरल्याने राज्यभरात खोमारपाडा प्रारूप राबविण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे.

मनरेगाअंतर्गत विविध योजना राबवून खोमारपाड्यातील नागरिकांनी भात शेतीपलीकडे जाऊन दुग्धव्यवसाय, भाजीपाला, रबी शेती, शेततळे व मत्स्यशेती, कुकुटपालन, शेळीपालन, तेलबियांचे लागवड कंपोस्ट व व्हर्मी कंपोस्ट निर्मिती केल्याने १२ महिने गावातच रोजगार उपलब्ध करून दारिद्र्यावर मात केली. दोन वर्षांत या गावाचे एकूण उत्पन्न २.१४ कोटी रुपयांवरून ३.१८ कोटी रुपयांवर पोहोचले. गावातील अनेक कुटुंबांनी दुचाकी व चार चाकी वाहने घेतली आहेत.

MHADA to release 629 houses in Mumbai Mandal on February 16 mumbai news
पत्राचाळीतील घरांचा ताबा; म्हाडाच्या मुंबई मंडळातील ६२९ घरांसाठी १६ फेब्रुवारीला सोडत
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
vasai virar loksatta news
वसई : निधी मिळाला, तीनदा भूमीपूजनही झाले मात्र रुग्णालय नाही; आचोळे रुग्णालयाची प्रतीक्षा कायम
Ten citizens of Bondgaon have gone bald to show sympathy towards patients of village who suffering from hairloss
मनोबल वाढविण्यासाठी सामूहिक मुंडन!
Rajput Gardens
मुघल गार्डन्सची जितकी चर्चा होते, तितकी ‘राजपूत गार्डन्स’ची का होत नाही?
Bangladesh Settlement name change demand by local residents
ऐकावे ते नवलच! नागपूरच्या एका वस्तीच्या नावाने तेथील हजारो लोकांसमोर संकट…
vasai virar municipal corporation Planning of development plan according to 10 sectors
विकास आराखड्याचे १० विभागानुसार नियोजन, आरक्षित भूखंडावर अतिक्रमणाबाबत महापालिकेचे मौन
Kasheli village in Rajapur is the first solar village in the state
राजापुरातील कशेळी गाव राज्यातील पहिले ‘सोलर गाव’

याच धर्तीवर पालघर जिल्ह्याने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमार्फत पालघर जिल्हयातील आठ तालुक्यांमध्ये ह्या ‘सुविधा संपन्न कुटुंब मिशन व सर्वांगीण ग्रामसमृद्धी- नंदादीप गाव संकल्पना’ जिल्ह्यातील सर्व यंत्रणा व ग्रामपंचायत विभाग यांच्यामार्फत एकूण १०८ ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे.

हेही वाचा >>>पालघरकरांनी रिचवले अकराशे कोटींचे मद्य, अकरा महिन्यांत ३ कोटी १७ लीटर मद्याची विक्री

नंदादीप समृद्ध योजना कशा प्रकारे राबवली जाते..

प्रत्येक कुटुंबाचा आर्थिक स्राोत उंचावण्यासाठी पायाभूत सुविधा वाढविणे, व्यवसायासाठी साधन सामग्री व इतर आवश्यक बाबींची उभारणी करणे, उत्पादनासाठी तांत्रिक साहाय्य व विक्रीसाठी विपणनाची जोड देणे व कुटुंबातील सदस्यांचा जीवनमानाचा स्तर उंचावण्यासाठी मनरेगा योजनेतील उपक्रम इतर विभागाच्या योज़ना अंतर्भूत करण्यात आले आहे. त्यामुळे मर्यादित आर्थिक सहभाग ठेऊन शासकीय योजनांचा लाभ उपभोगता आला.

मूल्यमापनाचे चार स्तर

समृद्ध कुटुंब होण्याकडे वाटचाल करताना या योजनेत मूल्यमापनाचे चार स्तर विचाराधीन घेतले असून सुविधापती पहिल्या टप्प्यात कुपोषणग्रस्त कुटुंबाकडे कुकर, मिक्सर, गॅस सुविधा प्राप्त होणे, दुसऱ्या टप्प्यात रेफ्रिजरेटर, डेटा प्याकसह मोबाइल कुटुंबातील प्रत्येक सदस्य आठव्या इयत्तेपर्यंत शिक्षित असणे, तिसऱ्या टप्प्यात स्वत:ची मोटरसायकल असणे व लखपती कुटुंबाकडे वाटचाल करणे तर सुविधापती टप्पा चारमध्ये स्वत:चे चार चाकी वाहन व कुटुंबाचे वार्षिक लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न घेऊन समृद्ध कुटुंब म्हणून वावरणे असे अपेक्षित आहे.

मनरेगाअंतर्गत वैयक्तिक स्वरूपाची कामे :

फळबाग लागवड, मजगी, जुनी भात शेती दुरुस्ती, शेततळे, अस्तरिकरण, नाडेप- व्हर्मी कंपोस्ट, फुलशेती, घरकुल कामे, सिंचन विहीर, विहीर पुनर्भरण, वैयक्तिक शौचालय, कुकुटपालन, गायगोठा तयार करणे, शेळीशेड तयार करणे

सार्वजनिक कामे :

तलावातील गाळ काढणे, रस्ते, वृक्ष लागवड व संगोपन, मैदान सपाटीकरण, ग्रामपंचायत भवन बांधणे, दगडी नाला बांधकामे, गाळ काढणे, वनतळे, जलशोषक, तुटक समतल चर खोदणे, रोपवाटिका

खोमारपाडा येथील शिक्षक बाबू मोरे यांच्या पुढाकाराने गावातील नागरिकांचे प्रबोधन करून त्यांचे रोजगारासाठी होणारे स्थलांतर रोखण्यासाठी मनरेगाच्या विविध योजनांची अंमलबजावणी टप्प्याटप्प्यांत करण्यात आली. सद्या:स्थितीत चार-पाच भूमिहीन कुटुंबांव्यतिरिक्त सर्व कुटुंबीय शेती व शेतीपूरक व्यवसाय यशस्वीपणे करत असून ही कुटुंबं लखपती झाली आहेत. – नंदकुमार, मिशन महासंचालक, मनरेगा

यशदा प्रशिक्षण केंद्र पुणे येथे प्रशिक्षणार्थी म्हणून मी सहभागी झालो. यावेळी राज्यातील ७० सरपंच उपस्थित होते. एक आदर्श गाव म्हणून प्रशिक्षक खोमरपाडा येथील प्रगतीचे, स्थलांतर थांबवून वाढलेले उत्पन्न यांचे सादरीकरण करत होते. हे ऐकून या गावचा सरपंच म्हणून मला अभिमान वाटला. – विलास गहला, सरपंच, खोमारपाडा

Story img Loader