तारापूर अणुशक्ती केंद्र तसेच तारापूर येथील भाभा अणू संशोधन केंद्राच्या लगतचा १.६ किलोमीटरचा पट्टा प्रतिबंधित (अपवर्जन क्षेत्र) म्हणून घोषित असून या ठिकाणाची सुरक्षितता सांभाळण्याची जबाबदारी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे (सीआयएसएफ) सोपविण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात याच अपवर्जन क्षेत्रात बांधकामाशी संबंधित ठिकाणी घरगुती वापरातील सुरीने खुनी हल्ला होऊन एका कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाला. यामुळे राष्ट्रीय महत्त्वाच्या या प्रकल्पाशी संबंधित सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त होऊ लागली आहे.

इंटिग्रेटेड न्यूक्लिअर रिसायकल प्लांट (आयएनआरपी)च्या उभारणीसाठी ठेका असणाऱ्या एका कंपनीच्या प्रनियमन संयंत्र (बॅचिंग प्लांट)मध्ये मिक्सरचे चालक म्हणून काम करणाऱ्या दोन कंत्राटी कामगारांमध्ये वाद निर्माण झाला होता. रेडी मिक्स काँक्रीट किंवा इतर बांधकाम साहित्य आणण्यासाठी हे मिक्सर नेहमी प्रकल्पाच्या आत-बाहेर करत असल्याने त्यांच्या तपासणीमध्ये ढिलाई झाल्याने एका चालकाने आसनाच्या खालच्या भागात चाकू लपवून तो चाकू या अपवर्जन क्षेत्रात आणला आणि संधी साधून चालकांच्या विश्रांती कक्षात खुनी हल्ला केला असा पोलिसांचा तर्क आहे.

thieves stole Metro pole in Shivajinagar area are arrested
शिवाजीनगर भागात मेट्रोचे खांब चोरणारे गजाआड, सुरक्षारक्षकाच्या तत्परतेमुळे चोरीचा प्रकार उघड
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Pratap Sarnaik Thackeray Group
Pratap Sarnaik : उद्धव ठाकरेंना मुंबईत धक्का बसणार? शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “ठाकरे गटाचे…”
Delhi Schools Receive Bomb Threat
Bomb Threat : दिल्लीतील शाळांना बॉम्बची धमकी प्रकरणात मोठी माहिती समोर; १२ वीच्या विद्यार्थ्याला अटक, कारण ऐकून सर्वांनाच बसला धक्का
Suresh Dhas , Walmik Karad, Amol Mitkari allegation ,
अकोला : सुरेश धस वाल्मीक कराडच्या संपर्कात होते, मिटकरींच्या आरोपाने खळबळ
person arrested from thane threatened deputy chief minister eknath shinde social media
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी देणाऱ्या तरुणाला अटक, समाजमाध्यमांवरून दिली होती मारण्याची धमकी
India campaign to kill terrorists in Pakistan print exp
पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हत्या घडवून आणण्याची भारताची मोहीम? ‘द वॉशिंग्टन पोस्ट’च्या दाव्यात किती तथ्य?
flyover Satis , Inspection important flyover thane ,
सॅटीससह तीन महत्त्वाच्या उड्डाणपुलांचे मुंबई आयआयटी मार्फत परिक्षण

हेही वाचा – तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये मध्ये वायुगळती, शिवाजीनगर परिसरात नागरिकांना चक्कर येण्याचे प्रकार

राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हे क्षेत्र अतिसंवेदनशील असणाऱ्या केंद्राच्या अपवर्जन क्षेत्रा (एक्सक्लुजन झोन)मध्ये असून या क्षेत्राभोवती चार स्तरीय सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली आहे. मात्र घडलेली घटना ही या परिसरात कार्यरत असणाऱ्या प्रकल्पाबाहेर असल्याने या क्षेत्रात कसून तपासणी व अंग तपासणी केली जात नसल्याचे सी.आय.एस.एफ.चे म्हणणे आहे. १.६ किलोमीटर हद्दीवर असणाऱ्या प्रवेशद्वारावर प्रकल्पात येणाऱ्या व्यक्तीकडे अधिकृतता असल्याची पासद्वारे तपासणी केली जात असून त्या ठिकाणी वैयक्तिक अंग तपासणी करण्याची व्यवस्था नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने या प्रकल्पात घुसखोरी करण्याचे प्रयत्न अथवा या प्रकल्पाच्या ठिकाणाहून चोरीचे प्रकार घडल्याचे दिसून आले आहे.
आय.एन.आर.पी. प्रकल्पातून महागड्या धातूची केबल, संगणकाचे भाग तसेच इन्स्ट्रुमेंटेशनशी संबंधित उपकरणांची चोरी झाल्याचे प्रकार यापूर्वी व अलीकडच्या काळापर्यंत घडत असल्याची माहिती पुढे आली आहे. एका प्रसंगी तारापूर पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी यांनी तांब्याची केबल चोरली जात असताना रंगेहाथ पकडले होते. त्यावेळी या केबलवर मालकी दाखवण्यास प्रकल्पाची उभारणी करणाऱ्या ठेकेदाराने नकार दर्शविला होता.

प्रकल्पातून पावसाचे पाणी वाहून जाणाऱ्या मार्गांमध्ये जाळ्या बसवण्यात आल्या असल्या तरीही गंजून सडलेल्या जाळ्यामधून तसेच संरक्षण भिंतीमधील कच्च्या दुव्यामधून काही स्थानिक मंडळी भूसंपादन झालेल्या जुन्या अक्करपट्टी व पोफरण गावांमध्ये जाऊन आंबा, चिंच, ताडगोळे, नारळ इत्यादी फळांची चोरी तसेच मासेमारी करत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. संरक्षण भिंतीलगत पेट्रोलिंग पथकाला जाण्यासाठी रस्त्याची उभारणी करण्यात आली असली तरी त्यांना चकवा देऊन स्थानिक मंडळी प्रतिबंधित ठिकाणी शिरकाव करून प्रकल्पामधील नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपभोग घेत असल्याबाबत प्रकार घडले आहेत. विशेष म्हणजे यापूर्वी अशा घुसखोरी करणाऱ्या काहींना पकडण्यास यशदेखील आले आहे.

आय.एन.आर.पी. प्रकल्प हा अणुऊर्जा प्रकल्पापासून एक किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर स्थित आहे. या प्रकल्पाची उभारणी होताना कंत्राटी कामगार इंटरनेट व छायाचित्र काढण्याची सुविधा असणारे स्मार्टफोन घेऊन वावरत असे, हे सर्वश्रुत होते. त्या संदर्भात वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर स्मार्टफोनवर बंदी घालण्यात आली असली तरीही अजूनही स्मार्टफोन छुप्या मार्गाने आणले जात असल्याचे तपासणीदरम्यान काहीप्रसंगी आढळले आहे.

हेही वाचा – मुसळधार पावसाने डहाणू बस स्थानक आणि आगारात पाणी घुसल्याने अनेक बस रद्द, प्रवाशांचे हाल

काही वर्षांपूर्वी याच प्रतिबंधित क्षेत्रात एका सुरक्षा कर्मचाऱ्याने पार्किंगमध्ये उभ्या वाहनाची चावी घेऊन प्रतिबंधित क्षेत्रामध्ये वाहन चालवताना अपघात घडला होता. त्यानंतर या इसमाने आत्महत्या करण्याचा प्रयत्नदेखील केल्याची माहिती पुढे आली होती. संवेदनशील केंद्रांमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करताना आवश्यक असणारे पोलीस पडताळणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी असणाऱ्या पद्धतीमध्ये पळवाटा असून प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे गेल्या सहा महिन्यांतील जिल्ह्यातील वास्तव्याचाच इतिहास अभ्यासला जातो. त्यामुळे अनेक कंत्राटी कामगारांची त्यापूर्वीची पार्श्वभूमी समजणे कठीण होत आहे. या प्रकल्पांमध्ये यापूर्वी कार्यरत असणाऱ्या वाहनांची परवानगी मिळविताना बनावट कागदपत्रांचा वापर झाल्याचे उघडकीस आले होते. भारतीय संघाचा पाकिस्तानबरोबर पराभव झाल्यानंतर पाकिस्तानचा जयघोष करणारे व फटाके फोडणारी मंडळी या ठिकाणी कार्यरत राहिली आहेत.

प्रकल्पात प्रवेशादरम्यान स्थानिकाची कसून चौकशी केली जात असताना नियमित ये-जा करणाऱ्या परप्रांतीय कंत्राटी कामगारांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे आरोप होत आहेत. मद्य प्रकल्पामध्ये होणारा शिरकाव ही चिंतेची बाब असून या व इतर काही संवेदनशील बाबींमुळे या प्रकल्पाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. या संदर्भात सुरक्षाव्यवस्था पाहणाऱ्या सी.आय.एस.एफ. यांच्या म्हणण्यानुसार तारापूर प्रकल्पाची सुरक्षा यंत्रणा सक्षम आणि कार्यक्षम असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र त्याविषयी अधिकृत वक्त्यव्य करण्यास स्थानिक अधिकारी तयारी दर्शवीत नाहीत.

अद्ययावत यंत्रणा कार्यान्वित

दोन्ही प्रकल्पांमधील कामगारांकडून घातपात करण्याचे प्रयत्न झाल्याचे उघडकीस आले आहेत. एका प्रसंगी एका कामगाराच्या आसनाखाली किरणोत्सर्गिक पदार्थ लपवून ठेवल्याने त्याला बाधा झाल्याचे उघडकीस आले होते. तर अन्य एका प्रकारात किरणोत्सर्ग पदार्थाचा संसर्ग असणारे कपडे हे प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर आणल्याचेदेखील उघडकीस आले होते. सद्य:स्थितीत किरणोत्सर्ग करणारे पदार्थ प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर येऊ नयेत म्हणून अद्ययावत यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.

Story img Loader