|| नीरज राऊत
करोनाकाळात उत्पन्न मिळविण्यासाठी अडचणी, जिल्हा प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा
पालघर : पालघर जिल्ह्यात आठ हजारपेक्षा अधिक अपंग व्यक्ती आहेत. त्यापैकी निम्मे जण अस्थी व नेत्रव्यंग आहेत. त्यांच्याकडे उदरनिर्वाहासाठी करोना काळात साधने नसल्याने त्यांच्यासमोर उत्पन्न मिळवण्यासाठी अडचणी उभ्या राहिल्या आहेत. या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने मदतीचा हात द्यावा अशी अपेक्षा या अपंगांकडून व्यक्त केली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्ह्यातील अपंग व्यक्तींपैकी शारीरिक अपंगत्व व इतर समस्या असणाऱ्या अनेक अपंग व्यक्तींकडून उदरनिर्वाहासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. टेलिफोन बूथ, खाद्यपदार्थ विक्री, कॅन्टीन चालवणे, घरगुती जेवणाचा डबा पुरविणे, अगरबत्ती व मेणबत्त्या उत्पादन करणे,  कागदी पिशव्या बनवणे, कार्यालयाच्या ठिकाणी देखरेखीसाठी उपस्थित राहणे अशा कामांचा समावेश आहे.

करोना काळामध्ये अनेक उपक्रमांवर निर्बंध आल्याने तसेच या काळात वाहतुकीसाठी साधने उपलब्ध नसल्याने अपंग व्यक्तीला घराबाहेर पडणे कठीण झाले होते. त्याच पद्धतीने अगरबत्ती, मेणबत्त्या अशा प्रकारचे उत्पादने बनवून दारोदारी फिरणे किंवा दुकानाच्या माध्यमातून विक्री करणे अशक्य झाल्याने तसेच खाद्यपदार्थांसाठी अपेक्षित प्रमाणात मागणी नसल्याने अशा व्यवसायांवर टाच आली होती. अशा अनेक अपंग व्यक्तींना मदतीचे ठरणारी उत्पन्नाची साधने बंद झाल्याने त्यांना आपल्या कुटुंबीयांवर आपण भार झाल्याची भावना निर्माण झाली आहे. शासनाकडे अपंगांसाठी वेगवेगळ्या योजना असल्या तरीही तयार केलेल्या उत्पादनाच्या विक्रीची समस्या असल्याने अपंगांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

‘सहानुभूती नको, रोजगार हवा’

वंदे मातरम अंध-अपंग सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून पालघर जिल्ह्याामध्ये नोंदणी असलेल्या ५०० पैकी अनेकांना जेवण, खाद्यपदार्थ तयार करण्याच्या माध्यमातून स्वयंरोजगार उपलब्ध केला जात आहे.  करोनाच्या महाआपत्तीमध्येसुद्धा हे काम अविरतपणे सुरू आहे. आमच्या संस्थेकडून उत्पादित अगरबत्ती आमचे सभासद   बनवत आहेत. मात्र विक्रीची समस्या असल्याने उत्पन्नाची समस्या निर्माण झाली आहे. नागरिकांनी अपंगांनी उत्पादित केलेली अगरबत्ती विकत घेतल्यास आम्हाला पाठबळ मिळेल व सहकार्य होईल, अशी अपेक्षा सफाळेच्या  वंदे मातरम् अंध-अपंग सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष  विनोद राऊत यांनी व्यक्त केली आहे. आमचे २०० सदस्य लसीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत, याकडेही प्रशासनाचे त्यांनी लक्ष वेधले आहे.

स्थानिक पातळीवरील मागण्या दुर्लक्षित

अंध व्यक्तीला ब्रेल लिपीचे शिक्षण मिळावे तसेच त्यांना गमनशीलतेचे (मोबिलिटी) करिता प्रशिक्षण घेऊन त्याला आत्मनिर्भर करणे तसेच वेगवेगळ्या उत्पादनाची प्रशिक्षण देऊन अशा उत्पादनाला विक्रीची (मार्केटिंग) जोड देणे गरजेचे आहे. करोना काळात वाहनांच्या तसेच वाहतुकीचे निर्बंध असल्याने दुर्धर आजार असेलेले, भिषक, कर्णबधिर व मानसोपचारदृष्ट्या अपंगत्व असलेल्यांसाठी त्यांच्या निवासस्थानी औषधोपचार मिळावेत, अशी मागणीदेखील पुढे येत आहे.

प्रमाणपत्रासाठी जिल्हास्तरीय सुविधा

अपंगत्व असणाऱ्या नागरिकांना प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक विभागाने व्यवस्था केली आहे. विरार, जव्हार व मोखाडा या ठिकाणी वेळापत्रकानुसार शिबिरांचे आयोजन करून हे प्रमाणपत्र देण्याचे काम सुरू आहे. त्याचबरोबरीने पालघर येथील शल्यचिकित्सक कार्यालय दर बुधवार विविध प्रकारच्या व्यंगांकरिता वेळापत्रकानुसार अपंगत्व प्रमाणपत्र देण्याचा कार्यक्रम आखण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली.