डहाणू : मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत वाडा खडकोना या गावातील आशेरी गडावर  शनिवार, रविवारी मुंबई – ठाणे, गुजरात येथून हजारोच्या संख्येने गर्दी करुन संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी कासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईत तब्बल ४० हजार ६०० चा दंडवसूल करण्यात आल्याची माहिती कासा पोलीसांनी दिली.

पावसाळा सुरू होताच पर्यटकांना गड-किल्ल्यांवर पर्यटनासाठी ओढ लागली आहे . त्यातच निर्बंध शिथिल होताच पर्यटकांची पावलेही पर्यटनस्थळी वळू लागली आहेत. शनिवार, रविवार पर्यटकांनी हजारोच्या संख्येने वाडा खडकोना या गावातील आशेरी गडावर मोठी गर्दी केल्याचे चित्र पहायला मिळाले. पालघर मधील आशेरी गडावर नागरीकांची हजारोच्या संख्येने तुफान गर्दी करत प्रशासनाने ठरवून दिलेले नियम पायदळी तुडविले आहे. रविवारची सुट्टी असल्याने  हजारो च्या संख्येने पर्यटक  पालघर सह  मुंबई ठाणे, गुजरात या बड्या शहरातील हजारो पर्यटक गडावर दाखल झाले आहे. पर्यटकांनी चित्रित केलेले  व्हिडीओ फेसबुक, वाटसापमधून  समाजमाध्यमांवर पसरल्यानंतर प्रशासनाने आशेरीगडावर जाऊन कारवाई केली. कासा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक उमेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक हिम्मत सरगर, पांडुरंग कावळे आणि कासा पोलीस कर्मचार्यांनी ही कारवाई केली.जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असताना पर्यटकांचा निष्काळजीपणा समोर आला आहे.

Potholes on internal roads due to rain in Pimpri city Pune news
पिंपरी: रस्त्यांची पुन्हा चाळण, यापुढे रस्त्यावर खड्डे पडल्यास कंत्राटदार, अधिकाऱ्यांवर…
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
navi mumbai,koparkhairane,footpath repairing started,
कोपरखैरणेत पदपथांची दुरुस्ती अखेर सुरू, सेक्टर १९ येथील मोठ्या खड्ड्यांमुळे पदपथ दोरी बांधून वापरासाठी बंद
Repair of potholes, Uran-Panvel road,
उरण-पनवेल मार्गावरील खड्ड्यांची दुरुस्ती, ‘लोकसत्ता’च्या वृत्ताने नागरिकांना दिलासा
Dombivli Kalyan Roads, Dombivli dust,
डोंबिवली, कल्याणमध्ये प्रवासी धुळीने हैराण
potholes roads Mumbai, Mumbai,
मुंबईतील रस्त्यावर आतापर्यंत १६ हजार खड्डे बुजवले, गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवण्यासाठी पालिकेची यंत्रणा युद्धपातळीवर कामाला
Special trains, Konkan, holidays,
सलग सुट्टीच्या दिनी कोकणात धावणार विशेष रेल्वेगाडी
Potholes in Pune are deadly Bike falls and accidents increase 20 percent increase in trauma patients
पुण्यातील खड्डे जीवघेणे! दुचाकी घसरून अपघात वाढले; दुखापतीच्या रुग्णांमध्ये २० टक्क्यांची वाढ

करोनाचे संकट हळूहळू कमी होऊ लागल्याने पर्यटकांचा ओढा हा पर्यटनस्थळी वाढू लागला होता. त्यातच रविवारी पर्यटन स्थळाच्या ठिकाणी मोठी गर्दी जमली होती. यामुळे करोना संसर्गाचा प्रादुर्भाव व इतर दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे.