पालघर / डहाणू : पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके विरुद्ध विक्रमगडचे आमदार सुनील भुसारा यांच्यातील वादाचे पडसाद डहाणूतही उमटले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने मंगळवारी बोडके यांच्याविरोधात डहाणू तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर निदर्शने करून तहसीलदारांना निवेदन दिले.
आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत जिल्हा आदिवासी उपाययोजना २०२३-२४ राज्यस्तरीय बैठकीदरम्यान बोडके आणि भुसारा यांच्यात शाब्दिक वाद झाला. यावेळी बोडके यांनी अपमानकारक विधान केले होते. त्यामुळे बोडके यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष काशिनाथ चौधरी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.