CPM Vinod Bhiva Nikole in Dahanu Vidhan Sabha Election 2024 महाराष्ट्र विधानसभा निवडणूक पार पडली आहे. डहाणू विधानसभा निवडणुकीत सीपीएमचे विनोद निकोले जिंकले आहेत. महायुतीच्या विजयी लाटेत विनोद निकोले जिंकले आहेत ही बाब महत्त्वाची मानली जाते आहे. डहाणू विधानसभा मतदारसंघ १२८ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, डहाणू मतदारसंघात पालघर जिल्ह्यातील १. तलासरी तालुका आणि २. डहाणू तालुक्यातील सायवान, मल्याण, डहाणू ( Dahanu ) ही महसूल मंडळे आणि डहाणू ( Dahanu ) नगरपालिका या क्षेत्राचा समावेश होतो. डहाणू हा विधानसभा मतदारसंघ पालघर लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जमाती – ST च्या उमेदवारांसाठी राखीव आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) चे विनोद भिवा निकोले हे डहाणू विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. विनोद निकोले यांनाच यंदाच्या निवडणुकीत पुन्हा तिकिट देण्यात आलं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा