पालघर : मासवण येथे सूर्य नदीवर असणाऱ्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यामधील खालच्या स्तराच्या लाकडी फळय़ा न काढल्याने मासवण, काटाळे व नदीलगतच्या भागातील किमान १०० हेक्टर भातशेती बाधित झाली आहे. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. या त्रुटीला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची तसेच शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे.

सूर्या नदीवरील मासवण येथील बंधाऱ्याच्या माध्यमातून पाणी अडवून त्यालगत असणाऱ्या ‘जॅकवेल’मधून वसई-विरार महापालिकेला पाणीपुरवठा केला जातो. तसेच पुलाच्या अलीकडे असलेल्या ‘जॅकवेल’मधून पालघर शहरासह १८ गावांसाठी पाणीपुरवठा योजना राबवली जात आहे. या दोन्ही पाणीपुरवठा योजनांसाठी पाण्याची पातळी पुरेशी राहावी, या दृष्टिकोनातून या बंधाऱ्याच्या खालच्या स्तरावरील प्रत्येकी दोन फळय़ा राखून ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे १४४ फळय़ा अडथळे असणाऱ्या बंधाऱ्यापैकी निम्म्या फळय़ा जुलैच्या शेवटच्या आठवडय़ापर्यंत कायम राहिल्याचे दिसून आले आहे.

Marathwada vidarbh farmers
विश्लेषण: सोयाबीनच्या हमीभावावरून शेतकऱ्यांची नाराजी का? ७० हून अधिक मतदारसंघांमध्ये ठरणार निर्णायक मुद्दा?
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
maharashtra vidhan sabha elections 2024, Rajura,
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट आंदोलन न करणाऱ्या ॲड. चटप यांना मतदार स्वीकारणार का?
Bad weather in Mumbai Measures against pollution Mumbai print news
मुंबईत निवडणुकीपर्यंत प्रदूषणाचा त्रास; मनुष्यबळाअभावी पालिकेची यंत्रणा हतबल
Issues of sugar factory in assembly elections is troubling candidate
विधानसभा निवडणुकीत साखर कारखानदारीचे मुद्दे पेटले!
Uran paddy fields, wild boars damage paddy fields,
उरण : रानडुकरांमुळे भातशेतीचे नुकसान, वन, कृषी विभागाचे दुर्लक्ष; शेतीची राखण करण्याची शेतकऱ्यांवर वेळ
Onion producers suffer due to losses consumers suffer due to price hike nashik news
नुकसानीमुळे कांदा उत्पादक, तर दरवाढीमुळे ग्राहक त्रस्त; कांदा शंभरीवर
Nagpur pollution latest news
दिवाळीत फटाके फुटले तरी प्रदूषण कमी, मात्र दिवाळी आटोपताच उपराजधानीत…..

जूनच्या तिसऱ्या आठवडय़ापर्यंत पाऊस लांबणीवर पडल्याने पाणीपुरवठय़ात कपात होऊ नये, या दृष्टिकोनातून केलेली ही उपाययोजना पावसाळा सुरू झाल्यानंतरही कायम होती. परिणामी, गेल्या आठवडय़ात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीपात्रातील पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहामध्ये अडथळा निर्माण होऊन पाण्याच्या पातळीत वाढ झाली. परिणामी, सूर्या नदीतील पात्राचे पाणी मासवण, काटाळे, निहे व इतर गावांमध्ये शिरल्याने शेतजमिनीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.

दगडी बांधकाम असणारा हा बंधारा जुना आहे. ३ जून १९७५ मध्ये अशाच प्रकारे फळय़ा न काढल्याने बंधारा वाहून गेल्याचे येथील ग्रामस्थ उत्तम पिंपळे यांनी पाटबंधारे विभागाच्या स्मरणात आणून दिले. या बंधाऱ्यामुळे लगतच्या भागांमध्ये रब्बी हंगामात लाभ होतो व पाण्याची पातळी राखली जाते. या नदीवर तारापूर औद्योगिक वसाहत, बोईसर परिसरातील गावे तसेच पालघर, वसई, विरार नळपाणी योजना आधारित आहे. संबंधित विभागाच्या हलगर्जीमुळे बंधारा फुटण्याची दुर्घटना घडली असती तर सध्या सुरू असलेल्या व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला असता. याबाबत अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. बंधाऱ्याच्या फळय़ा राहिल्यामुळे लगतच्या भागातील १०० हेक्टर भातशेती बाधित झाल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. या बाधित ठिकाणी नुकसान झाल्याचे सर्वेक्षण हाती घेतल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.

२९ जुलैला फळ्या काढल्या

पाणीपुरवठा योजनेसाठी ठेवलेल्या फळय़ांमुळे नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढत असल्याने २९ जुलै रोजी पाणीपुरवठा विभागाने बंधाऱ्यातील फळय़ा काढून टाकल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना आढावा बैठकीदरम्यान दिली. यामुळे मौसमी पावसाच्या यंदाच्या हंगामात बंधाऱ्याला धोका पोहोचण्याची शक्यता निवळली आहे.