पालघर: मनोर-पालघर राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे वर्ग झाल्यानंतर रस्त्याचे मजबुतीकरण झाले असले तरी या रस्त्यावरील हात नदी पुलाजवळ असलेले वळण असुरक्षित असून ते धोकादायक ठरू लागले आहे.
रविवारी रात्रीच्या सुमारास भरधाव वेगातील कंटेनर चालकाचे या वळणावर नियंत्रण सुटल्याने अपघात झाला व कंटेनर रस्त्याच्या कडेला उलटला. यावेळी वाहतूक नसल्याने अनर्थ टळला अन्यथा इतर वाहनेही या कंटेनरच्या कचाटय़ात सापडून मोठी दुर्घटना झाली असती. अपघातात स्थळाला लागून सावरखंड उपकेंद्राला वीजपुरवठा करणारी उच्च दाबाच्या वहिनीचा खांब होता.अपघात ग्रस्त कंटेनर खांबाला धडकला असता तर सावरखंड उपकेंद्राचा वीजपुरवठा खंडित झाला असता.या अपघातानंतर या धोकादायक वळणाचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे.
वळणावर महामार्गाच्या नांदगाव फाटय़ावरून येणार रस्ता जोडला आहे. पालघर जिल्हा मुख्यालय झाल्यापासून रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. तसेच रस्ता चांगला केल्यानंतर रस्त्यावर वाहनांचा वेगही वाढला आहे. त्यामुळे हात नदी पुला लगतच्या वळणावर अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. या वळणावर वर्षभरात पंधरा ते वीस दुचाकींचे अपघात झाले आहेत. अपघातांमध्ये अनेक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले होते.त्यामुळे वळणावर सुरक्षा कठडे व गती रोधक उभारण्याची मागणी होत आहे.
वळणावर घडलेले अपघात
२ ऑक्टोबर २०२१ रोजी मनोर ग्रामपंचायतीच्या विसर्जन घाटालगत कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनरने समोरून येणाऱ्या टेम्पोला धडक दिल्याने अपघातात दोन्ही वाहनांच्या चालकांसह चार जण जखमी झाले होते. त्यानंतर हातनदी पुलाजवळील वळणावर घडलेल्या अपघाताने हा प्रश्न उपस्थित झाला आहे.