पालघर/वाडा: वाडा तालुक्यातील महावितरण विभागाचे उप कार्यकारी अभियंता ज्ञानेश्वर वट्टमवार यांना एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. विभागाच्या पालघर पथकाने ही कारवाई केली. वट्टमवार हे अनेक कारणांमुळे गाजलेले अधिकारी आहेत असे सांगितले जाते. त्यांनी तक्रारदार यांच्याकडून बिल मंजूर करून घेण्यासाठी एक लाख रुपायांची लाच मागितल्याने तक्रारदार यांनी तशी तक्रार पालघरच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. तक्रारदाराने केलेल्या तक्रारीनुसार या प्रकरणाची शहानिशा केल्यानंतर तथ्य आढळून आले. त्यानंतर लाचलुचपत पालघरचे पोलीस उप अधीक्षक नवनाथ जगताप,पोलीस निरीक्षक स्वप्नन बिश्वास यांच्या पथकाने सापळा रचला. तक्रारदाराने एक लाखांची लाच स्वीकारताना वट्टमवार यांना रंगेहात पकडल्यानंतर पालघर पथकाने त्यांना ताब्यात घेतले व वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 18th Oct 2022 रोजी प्रकाशित
वाडा महावितरणचे उपकार्यकारी अभियंता यांना एक लाख रुपयांची लाच घेताना अटक
वाडा तालुक्यातील महावितरण विभागाचे उप कार्यकारी अभियंता ज्ञानेश्वर वट्टमवार यांना एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 18-10-2022 at 20:58 IST
Palghar News (पालघर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deputy executive engineer of wada mahavitaran arrested for accepting bribe of rs 1 lakh ysh