पालघर: पालघर जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी संजीत धामणकर याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहाथ पकडले. लाचलुचपत विभागामार्फत दक्षता जनजागृती सप्ताह सुरू असतानाच पालघरच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

तक्रारदार महिला पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून धामणकर याने दहा हजाराची लाच स्वीकारली. तक्रारदार पशुवैद्यकीय अधिकारी यांची बदली झाली असताना धामणकर याने तक्रारदार यांना कार्यमुक्त व पदभारमुक्त करण्यासाठी वीस हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी पालघरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तशी तक्रार दिली प्रतिबंधक विभागाने तक्रारीची पडताळणी केली व सापळा रचला धामणकर याने २०००० पैकी दहा हजार रुपयाची आगाऊ रक्कम तक्रारदार यांच्याकडून स्वीकारल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धामणकर याला रंगेहात पकडले असून पुढील कारवाई सुरू आहे. पोलीस उपअधीक्षक नवनाथ जगताप, पोलीस निरीक्षक स्वप्न विश्वास यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे

Story img Loader