डहाणू : वाढवण समुद्र किनाऱ्यावर जखमी अवस्थेत आढळलेल्या डॉल्फिन माशाला ग्रामस्थांनी वनविभागाच्या ताब्यात दिले होते. मात्र, डहाणू येथील कासव उपचार केंद्रात त्याच्यावर प्राथमिक उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डहाणू तालुक्यातील वाढवण समुद्र किनाऱ्यावर रविवारी दुपारी ४ वाजता ग्रामस्थांना एक जखमी डॉल्फिन आढळला होता. ग्रामस्थांनी त्याला पुन्हा समुद्रात सोडण्याचा प्रयत्न केला तो पुन्हा समुद्राच्या बाहेर येत होता. ग्रामस्थांनी या बाबतची माहिती डहाणू वनविभागाला देताच त्यांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला उपचारासाठी डहाणू येथील कासव उपचार केंद्रात दाखल केले. या डॉल्फिनला आंतरिक आणि बाह्य अंगावर मोठय़ा प्रमाणात जखमा झाल्या होत्या. दरम्यान उपचारादरम्यान रविवारी रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाला.

बिपरजॉय वादळामुळे समुद्र खवळला होता. त्यामुळे डॉल्फिन जखमी होऊन समुद्रा बाहेर फेकला गेला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या डॉल्फिनची लांबी सात फूट, वय साधारण १० ते १२ वर्ष आणि वजन ४५ किलो असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान, डॉल्फिनचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे त्याचे शवविच्छेदन झाल्यानंतर समजू शकणार असल्याचे सांगण्यात आले.