‘राष्ट्रात मोदी आणि राज्यात शिंदे’ या जाहिरातीवरून महायुती सरकारमध्ये वादळ निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. या जाहिरातीनंतर भाजपाने शिंदे गटातील नेत्यांना जाहीर इशाराही दिला होता. त्यानंतर, ‘गर्जा महाराष्ट्र माझा’च्या जाहिरातीने या प्रकरणाचा उत्तरार्ध करण्यात आला. या सर्व प्रकरणात एकनाथ शिंदे यांनी उघड भूमिका जाहीर केली नव्हती. पालघरमध्ये आज झालेल्या ‘शासन तुमच्या दारी’ या कार्यक्रमात आज त्यांनी जाहिररीत्या याबाबत भाष्य केलं आहे. तसंच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत असलेल्या मैत्रीचाही उल्लेख त्यांनी केला.

हेही वाचा>> जाहिरातीवरून शिंदे गट-भाजपा नेते भिडले, जाहीर भाषणात देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मी…”

Vishnu Bhangale suspended from the Thackeray group, is now Jalgaon district head of Shinde group
जळगावमध्ये ठाकरे गटातून निलंबित, विष्णू भंगाळे आता शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
dcm eknath shinde loksatta news
“सर्वसामान्यांसाठी राज्यात परवडणारे घरी उभारण्याचा आमचा अजेंडा”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
What Eknath Shinde Said?
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला, “सरडाही रंग बदलतो, पण अशी नवी जात…”
eknath shinde shivsena
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात, “सर्व पक्षांनी एकच रस्ता धरलाय, तो म्हणजे धनुष्यबाणाची शिवसेना”
forest minister ganesh naik slams eknath shinde working style during cm tenure
शिंदेशाहीतील चुकांची उजळणी करत नाईकांचे वर्चस्वाचे संकेत
sanjay gaikwad controversial statement
Sanjay Gaikwad: “तुमच्यापेक्षा तर रांXX बऱ्या”, शिंदे गटाच्या आमदाराची मतदारांनाच शिवीगाळ, भर सभेत जीभ घसरली!
Eknath Shinde )
Eknath Shinde : “मीच टांगा पलटी करून नवीन सरकार आणलं”, उद्योगपतींसमोर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?

एकनाथ शिंदे म्हणाले की, “शासन आपल्या दारी कार्यक्रमातील गर्दी पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांना धडकी भरली आहे. पोटदुखी सुटली आहे. ही युती झाली ती स्वार्थासाठी झाली नाही. सत्तेसाठी झाली नाही. गेली २५ वर्षे वैचारिक भूमिकेतून युती झाली. बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांचे विचार आणि आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली सरकार काम करतंय. मधल्या काळात मिठाचा खडा टाकला होता. पण तो मिठाचा खडा आम्ही उचलून फेकून दिला. म्हणून भक्कम युती झाली. खऱ्या अर्थाने लोकांच्या मनातील सरकार स्थापन केलं. त्यामुळे काहीह म्हटलं तरी आमच्यात दरी निर्माण होऊ शकत नाही. कारण हे सरकार एका विचाराचं सरकार आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

“माझी आणि देवेंद्रजींची आताची दोस्ती नाही. गेल्या १५-२० वर्षांपासून दोस्ती आहे. ही दोस्ती जिवाभावाची मैत्री आहे. आमच्या दोघांचं बॉन्डिंग मजबूत आहे. ये फेविकॉल का जोड है, तुटेगा नही. तुटणार नाही. कितीही प्रयत्न केला तरी. काही म्हणतात जय विरू की जोडी, काहीजण धरम-वीरची जोडी. ही जोडी खुर्चीसाठी, स्वार्थासाठी झालेली नाही. स्वार्थासाठी एकत्र झाले होते त्यांना सामान्य जनतेने बाजूला केलं”, असा टोलाही शिंदेंनी यावेळी लगावला.

हेही वाचा >> Photo : “ये फेविकॉल का जोड…” जाहिरातीच्या वादानंतर शिंदे-फडणवीस एकाच व्यासपीठावर

आमचं फेसबुक लाईव्ह सरकार नाही

आताच्या परिस्थितीमध्ये संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली असताना दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आपली अर्थव्यवस्था आणण्याचं काम आपल्या पंतप्रधानानी केलं आहे. फक्त देशामध्ये नाहीच तर जगामध्ये लोकप्रियतेत एक नंबरला आहे. खुर्ची आणि सत्तेत आम्हाला मोह नाही. मी काय आणि देवेंद्र फडणवीस काय, आम्ही कालही कार्यकर्ते म्हणून काम करत होतो, आजही कार्यकर्ते म्हणून काम करतोय आणि उद्याही कार्यकर्ते म्हणूनच काम करणार. सत्तेची हवा आमच्या डोक्यात नाही. आजही आमचे पाय जमिनीवर आहेत, म्हणून आम्ही रात्रंदिवस काम करतोय, रस्त्यांवर फिरतोय. प्रकल्पांना भेटी देतोय. घरामध्ये बसून आदेश देणारं आमचं सरकार नाही. फेसबुक लाईव्ह सरकार आमचं नाही. फिल्डवर काम करणारं, अॅक्शन मोडमध्ये जाणारं आमचं सरकार आहे.

Story img Loader