पालघर: पश्चिम रेल्वेच्या वैतरणा स्थानकात मुंबई अहमदाबाद पॅसेंजरच्या गाडीचे इंजिन सुटून पुढे जाण्याचा प्रकार आज दुपारी घडला. प्रवाशांनी याबद्दल इंजिन चालकाला सावध केल्यानंतर गाडीच्या डब्यांना इंजिन जोडून अर्धा तासांनी गाडी पुन्हा रवाना झाली. आज दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास वैतरणा रेल्वे स्थानकातुन पॅसेंजर गाडी फलटवून रवाना होताना इंजिन सुटून पुढे गेल्याने गाडीला जोरात झटका लागला व व्याक्युम सुटल्याचा आवाजाला. गाडीमधील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊन आरडाओरडा सुरू झाली होती.

मात्र हा प्रकार इंजिनच्या ड्रायव्हरच्या लक्षात आल्याने पुढे जाऊन इंजिन थांबवण्यात आले. ४० मिनिटानंतर इंजिन पुन्हा पाठी आणून गाडीला पुन्हा जोडण्यात आले. या प्रकारामुळे पश्चिम रेल्वेची गुजरातच्या दिशेने जाणारी वाहतूक  काही काळ ठप्प राहिली. पश्चिम रेल्वेचे डहाणू रोड पर्यंत स्वयंचलित सिग्नल प्रणाली कार्यरत असून एखादे इंजिन दोन सिग्नल ओलांडून पुढे गेल्या की त्यामागील तिसरा सिग्नल प्रथम पिवळा व नंतर गाडी आणखी एक सिग्नल पुढे गेल्यानंतर हिरवा होत असतो. गाडीपासून इंजिन विभक्त होण्याचा प्रकार वैतरणा रेल्वे स्थानकाऐवजी दोन स्थानकांच्या दरम्यान घडला तर मोठी दुर्घटना होऊ शकली असती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र प्रवाशांनी केलेल्या आरडाओरड मुळे तसेच इंजिन चालकाने दाखवलेल्या समाजशिक्षकतेमुळे पुढील अनर्थ टाळला. करोना संक्रमणानंतर पश्चिम रेल्वे वरील सर्व पॅसेंजर गाड्यांना एक्सप्रेसचा दर्जा देण्यात आला असून त्यानुसार प्रवाशांना वाढीव तिकीट आकारणी करण्यात येत आहे. प्रत्यक्षात या गाड्यांच्या डब्यांमधील सुविधा स्वच्छता कोणतीही सुधारणा झालेली नसून त्यांच्या धावण्याच्या वेळेत कोणताही बदल करण्यात आला नाही. जुने डबे तसेच जुन्या व्यवस्थेमुळे हा अपघात घडल्याचे प्रवाशांकडून आरोप केले जात आहेत.