लोकसत्ता वार्ताहर

पालघर: पोलीस असल्याची बतावणी करत ५०० रुपयांच्या नोटांच्या बदल्यात १०० रुपयांच्या दुप्पट किमतीच्या नोटा देण्याचे आमिष देऊन फसवणूक करणाऱ्या तोतया पोलिसाला कासा पोलिसांच्या सतर्कतेमूळे जेरबंद करण्यात यश आलं आहे. मधुकर बड असे या तोतया पोलीसाचे नाव असून तो पालघरच्या विक्रमगड मधील उटावली चौधरी पाडा येथील रहिवासी आहे.

Congratulatory grant sanctioned to PMRDA employees
पीएमआरडीएच्या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान मंजूर
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
Maharashtra state government has given complete toll exemption for light vehicles at all the five toll booths at the entry point of Mumbai
मुंबईच्या वेशीवर टोलमाफी; हलकी वाहने, एसटी, शाळेच्या बस पथकरातून मुक्त, तिजोरीवर एक हजार कोटींचा आर्थिक भार
dri seized smuggled gold worth rs 4 5 crore at talegaon toll plaza
तळेगाव टोलनाक्यावर तस्करी करुन आणलेले साडेचार कोटींचे सोने जप्त, महसूल गुप्तचर संचलनालयाची कारवाई
devendra fadnavis on women complaints
महानगरातील आव्हाने पेलण्यासाठी पोलीस दलात अत्याधुनिक सुविधा- महिलांच्या तक्रारी प्राधान्याने सोडविण्याचे गृहमंत्री फडणवीस यांचे आदेश
pune police open murder case on courier delivery
कुरिअरच्या डिलिव्हरीवरून खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींच्या मुसक्या आवळल्या
Two policemen arrested for kidnapping and demanding ransom nagpur
पोलिसांना झाले तरी काय ? अपहरण करुन खंडणी मागणाऱ्या दोन पोलिसांना अटक
Recently trader selling scrap was robbed at gunpoint in Baramatis Lokhande Vasti area
बारामतीत पिस्तुलाच्या धाकाने व्यापाऱ्याची लूट, ग्रामीण पोलिसांकडून तिघे गजाआड

तलासरी शनवारपाडा येथील महेश रायात यांनी कासा पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपीला विक्रमगड मधील राहत्या घरातून अटक केली आहे. आरोपी मधुकर बड या तोतयाने फिर्यादी सोबत संपर्क साधून तुझ्याकडे ५०० रुपयांच्या नोटा असतील तर त्या घेऊन ये त्या बदल्यात माझे मुंबईचे काही मित्र १०० रुपयांच्या दुप्पट किमतीच्या नोटा देतात अशी फसवणूक करत फिर्यादीला मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग लगत कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चारोटी येथे बोलवून घेतलं. त्यानंतर युनिकॉर्न बाईकवर आलेल्या दोघांच्या बॅगमध्ये पाचशे रुपयांच्या नोटांची दोन बंडल म्हणजे तब्बल लाख रुपये आरोपी मधुकर बड याने ठेवण्यास सांगितले.

हेही वाचा… Monsoon Update: आजही अतिवृष्टीचा इशारा; दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी, अधूनमधून सरीवर सरी  

फिर्यादीने ५०० रुपयांच्या नोटा बॅगेत ठेवताच बाईक वरून आलेल्या दोन्ही आरोपीच्या साथीदारांनी घटनास्थळावरून पळ काढला. आपली फसवणूक झाल्याच लक्षात येताच पीडित महेश रायात यांनी कासा पोलीस ठाण्यात धाव घेतली. मिळालेला बाईकचा नंबर आणि फिर्यादीने दिलेल्या नावा नंतर कासा पोलिसांनी चक्र फिरवत विक्रमगड येथून आरोपी तोतया पोलिसाला अटक केली आहे. तर आरोपी सोबत असलेल्या आणखी साथीदारांचा शोध सध्या पोलीस घेत असल्याची माहिती कासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांनी दिली आहे.  या संदर्भात कासा पोलीस ठाण्यात भा.द.वी. ४२०, १७०,  ३४  नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच अशा आमिषांना नागरिकांनी बळी पडू नये असं आवाहन पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांनी केल आहे.