पालघर : यंदाच्या खरीप हंगामात चांगला पाऊस झाल्याने तसेच परतीच्या पावसामुळे विशेष नुकसान न झाल्याने पालघर जिल्ह्यातील शेतकरी सुखावला होता. भाताची कापणी पूर्ण होऊन झोडणी, मळणीच्या स्थितीमध्ये पावसाने अचानक दमदार हजेरी लावल्याने शेतकरी तसेच बागायतदार, मच्छीमार व इतर व्यावसायिक हवालदिल झाले आहेत.

पालघर जिल्ह्यात २५ ते २७ नोव्हेंबरदरम्यान काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. जिल्ह्यात २६ नोव्हेंबर रोजी दिवसभरात सरासरी २३ मिलीमीटर तर उर्वरित दिवसांत सरासरी ३५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. २६ नोव्हेंबर रोजी अनेक ठिकाणी दिवसभर संततधार सुरू राहिल्याने लग्नसराईलादेखील मोठ्या प्रमाणात पावसाची झळ बसली.

p chidambaram article analysis maharashtra economy
समोरच्या बाकावरून : अर्थव्यवस्था तारेल त्यालाच मत
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
maharashtra vidhan sabha elections 2024, Rajura,
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट आंदोलन न करणाऱ्या ॲड. चटप यांना मतदार स्वीकारणार का?
Bad weather in Mumbai Measures against pollution Mumbai print news
मुंबईत निवडणुकीपर्यंत प्रदूषणाचा त्रास; मनुष्यबळाअभावी पालिकेची यंत्रणा हतबल
Uran paddy fields, wild boars damage paddy fields,
उरण : रानडुकरांमुळे भातशेतीचे नुकसान, वन, कृषी विभागाचे दुर्लक्ष; शेतीची राखण करण्याची शेतकऱ्यांवर वेळ
Chief Minister of Telangana, Himachal and Deputy Chief Minister of Karnataka reply to BJP on the scheme Print politics
गरिबांचे पैसे गरिबांना ही काँग्रेसची हमी; तेलंगणा, हिमाचलचे मुख्यमंत्री तर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे भाजपला प्रत्युत्तर
Assembly Election 2024 Malegaon Outer Constituency Dada Bhuse print politics news
लक्षवेधी लढत: मालेगाव बाह्य : मंत्री दादा भुसे यांचा मार्ग यंदा खडतर
Nagpur pollution latest news
दिवाळीत फटाके फुटले तरी प्रदूषण कमी, मात्र दिवाळी आटोपताच उपराजधानीत…..

हेही वाचा – जव्हार, मोखाडा मधील गाव पाड्यातील आदिवासी कुटुंबात रोजगारासाठी स्थलांतर… गावामध्ये वृद्ध आणि बालके

पालघर जिल्ह्यात सुमारे ७८ हजार हेक्टर क्षेत्रफळावर भाताची लागवड झाली आहे. डहाणू व तलासरी वगळता इतर भागांमध्ये भात पिकाचे सुमारे ५४८ हेक्टर क्षेत्रफळावर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम हाती घेण्यात आले असून, वाडा, विक्रमगड, पालघर, जव्हार व मोखाडा येथे झालेल्या पावसाची तीव्रता पाहता नुकसानीचा आकडा काही पटीने वाढेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना वारंवार फटका बसत असून गेल्या काही वर्षांपासून हातात आलेले भातपीक निसर्गाच्या कोपामुळे वाया गेल्याचे अथवा त्याचे नुकसान झाल्याचे दिसून आले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून मत्स्य दुष्काळ भेडसावणाऱ्या मच्छीमारांनादेखील अवकाळी पाऊस, अरबी समुद्रात निर्माण होणारे वादळी वातावरण व तेलाच्या शोधासाठी होणाऱ्या सर्वेक्षणाचा फटका बसला आहे. पावसाळा संपल्यावर ऑक्टोबरपासून किनारपट्टीच्या विविध भागांत मोठ्या प्रमाणात मासळी सुकविण्यास सुरुवात होते. यामध्ये बोंबील, मांदेळी, करंदी, जवळा, बांगडा, माकूल अशा विविध माशांना सूर्यप्रकाश आणि मिठाच्या साहाय्याने सुकवून बऱ्याच काळ ठेवले जाते. ही सुकी मासळी फेब्रुवारी ते मे महिन्यादरम्यान विविध ठिकाणच्या आठवडा बाजारात विक्रीसाठी पाठवली जाते. नोव्हेंबर डिसेंबरमध्ये मासे सुकवण्याचा हंगाम सुरू आहे. धाकटी डहाणू, डहाणू तालुक्यातील इतर भाग तसेच तलासरी व पालघर तालुक्यात मासे सुकवणाऱ्या व्यावसायिकांचे दीड ते दोन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

भाजीपाला लागवड करणाऱ्या बागायतदारांना बुरशीजन्य आजारांमुळे पिकाला बाधा निर्माण होण्याची शक्यता असून या भागात मोठ्या प्रमाणात मिरची लागवड करणारे शेतकरीही धास्तावले आहेत. काही ठिकाणी आंब्याला मोहर आल्याने आंबा उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर, पावसामुळे तयार चिकू गळून पडणे, बुरशीजन्य आजार पसरणे तसेच फळाच्या नुकसानीची शक्यता वाटू लागली आहे.

वीट उत्पादनाचा हंगाम सुरू होत असताना झालेल्या मुसळधार पावसामुळे उत्पादन प्रक्रियेला विलंब होणार आहे. विटा पाडण्याचे काम सुरू झाले असल्याने त्यांच्या कामामध्ये व्यत्यय निर्माण झाल्याने वीटभट्टीचा हंगामदेखील लांबणीवर पडला आहे. वीटभट्ट्या उभारण्याचे काम सुरू असून या विटा भाजण्यापूर्वीच पाऊस झाल्याने वीट उत्पादकांचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा – वाढवण बंदराविषयी जनसुनावणी पुढे ढकला; बंदर विरोधी संघटनेसह बाधीत ग्रामपंचायत सरपंचांच्या बैठकीत ठराव

निसर्गातील लहरीपणामुळे शेतकरी, बागायतदार व अनेक व्यावसायिकांवर अनिश्चिततेची कुऱ्हाड टांगती राहत असल्याने सर्व व्यावसायिकांना कमी-अधिक प्रमाणात तोट्याला सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे देशाने प्रगत तंत्रज्ञान विकसित केल्याचे अनेक ठिकाणी अभिमानाने सांगितले जात असतानाही हवामानाचा अचूक अंदाज देण्यास हवामान विभाग तसेच सर्व संबंधित विभागाला अपयश येत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक व व्यावसायिक यांच्यासमोर अनेकदा समस्यांचा डोंगर उभा राहताना दिसून आला आहे.

शेती सोडण्याचा अनेकांचा विचार

नैसर्गिक आपत्ती घडल्यानंतर बाधित शेतकऱ्यालाच सरकारी यंत्रणेच्या मागे लागून नुकसानीचे पंचनामे करून घ्यावे लागतात. असे सर्वेक्षण करतानाही अनेकदा पक्षपातीपणा केला जात असून, अनेकांवर अन्याय होताना दिसून येतो. याशिवाय सरकारकडून देण्यात येणारी नुकसानभरपाईची रक्कमही प्रत्यक्षात झालेल्या नुकसानीच्या तुलनेत तूटपुंजी असल्याने मोठ्या कालावधीनंतर देण्यात येत असल्याने या भरपाईचा बाधितांना विशेष लाभ होत नाही, असे दिसून आले आहे. सरकारची एकूण भूमिका शेतीस पूरक नसल्याने लहरी निसर्ग मनुष्यबळाची मर्यादा व इतर वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणींमुळे शेती करण्यापासून परावृत्त होण्याची मानसिकता निर्माण झाल्याचे जिल्ह्यात अनेक ठिकाणी दिसून आले आहे.