पालघर तालुक्यातील माहीम येथील एका निर्जन ठिकाणी १५ वर्षीय एका तरुणीवर आठ नराधामांनी सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी सातपाटी पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे.माहीम येथे वास्तव्य करणारी एक तरुणी आपल्या मित्रासह किनाऱ्या लगतच्या टेंभी परिसरात गेली असता निर्जन ठिकाणी असणाऱ्या बंगल्यांमध्ये आठ तरुणांनी आलटून पालटून रात्रभर बलात्कार केला. त्यानंतर शनिवारी सकाळी या मुलीला भीती दाखवून पालघर जवळील माहीम हरणवाडी परिसरात सोडून देण्यात आले.
आपली मुलगी रात्रभर घरी न आल्याने तसेच मोबाईल संपर्क होत नसल्याने तिच्या पालकांनी पोलिसांकडे काल दुपारी फिर्याद दाखल केली. मुलीचे वय व प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेऊन मुलीचे मोबाईल लोकेशन द्वारे सातपाटी पोलीस त्या ठिकाणापर्यंत पोहोचले व मुलीला ताब्यात घेतले.
या मुलीवर प्राथमिक वैद्यकीय उपचार केल्यानंतर तिच्या पालकांसमक्षतीला विश्वासात घेऊन दोषी असणाऱ्या तरुणांचा तपशील गोळा केला. पालघर पोलिसांनी नंतर वेगवेगळी पथक तयार करून या सर्व आरोपींना सायंकाळी उशिरापर्यंत ताब्यात घेतले. याप्रकरणी संबंधितां – विरुद्ध पॉस्कॉ व अपहरण केल्याच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पालघरच्या उपविभागीय पोलिस अधिकारी नीता पाडवी या प्रकरणी तपास करीत आहेत.