पालघर : पालघर, डहाणू, वापी, वलसाड व सुरत येथील दैनंदिन प्रवास करणाऱ्या हजारो नोकरदारांची लाईफ लाईन असलेली फ्लाईंग राणी १६ जुलैपासून नव्या स्वरूपात प्रवाशांच्या सेवेत रुजू झाली आहे. १९७७ पासून विद्युत प्रणालीवर धावणाऱ्या या गाडीचे १८ डिसेंबर १९७९ साली असलेले डबल-डेकर मध्ये रुपांतर करण्यात आले होते. जर्मन तंत्रज्ञानावर आधारित एल. एच. बी. पद्धतीचे २१ डबे या गाडीमध्ये कार्यरत करण्यात आले आहेत.
१९०६ पासून कार्यरत असणारी ही गाडी पहिल्या महायुद्धाच्या काळात बंद ठेवण्यात आली होती. १ मे १९३७ रोजी ही गाडी पुन्हा सेवेत कार्यरत झाली. तत्कालीन वलसाड प्रांताच्या जिल्हाध्यक्ष यांच्या पत्नीने या गाडीचे फ्लाईंग राणी असे नामकरण केले आहे. फ्लाईंग राणी १९६५ सुमारास मध्यम पल्ल्याची सर्वात जलद गाडी असल्याचा मान पटकावला होता. त्यानंतर देशातली ही पहिली डबल-डेकर गाडी पश्चिम रेल्वेची शान असल्याने याला फ्लाईंग राणी असे नाव सार्थक ठरले.
१९९८-९९ च्या सुमारास या गाडीला पालघर येथे थांबा देण्यात आला. त्यानंतर या भागातील दैनंदिन प्रवासी, विद्यार्थी, नोकरदार वर्ग यांच्यासाठी या गाडीतील डबे हे जणू प्रवासातील आश्रयाचे ठिकाण ठरले होते. या गाडीची सन २००१ मध्ये डबल डेकर डबे नव्याने बदलण्यात आले होते, तेव्हापासून गेली २२ वर्ष हे डबे कार्यरत राहिले आहेत.
प्रवाशांसाठी अधिक आरामदायी व सुरक्षित असे कोच डबे या गाडीत अंतर्भूत करण्यात आले असून त्यामध्ये वातानुकूलित चेअर कार, सात विना आरक्षित डबे, पासधारकांसाठी एक प्रथम दर्जा व एक सामान्य डबा, महिला पास धारक प्रवाशांसाठी स्वतंत्र डबा या गाडीत अंतर्भूत करण्यात आला आहे. डब्यांची संख्या वाढली असली तरी प्रवाशांना वाहून नेण्याची संख्या जवळपास तितकीच राहिली असून लाल व निळया रंगांच्या डब्यांमुळे या गाडीला आकर्षक स्वरूप बहाल झाले आहे.
रानी नव्हे राणी..
या नव्या गाडीच्या नावा फलकावर मराठीमध्ये ‘फ्लाईंग रानी’ असे संबोधित करण्याऐवजी हिंदीमध्ये ‘फ्लाईंग रानी’ असे उल्लेखित आहे. मात्र या खालोखाल गुजराती अक्षरांमध्ये राणी असा उल्लेख वैशिष्टय़पूर्ण केला असल्याने पश्चिम रेल्वेने मराठीमधील नामफलक न करता हिंदीमध्ये उल्लेखित केल्याने प्रवाशांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे आहे.
फाटके आसन, गळके छत
बदलण्यात आलेल्या डब्यांपैकी काही डबे जुने असून पहिल्या दज्र्याच्या डब्यांमधून पावसाचे पाणी झिरपत असल्याचे प्रवासादरम्यान दिसून आले १३६ आसन क्षमता असणाऱ्या डबल डेकर डब्यांऐवजी १०२ आसन क्षमता असणारे डबे बसविण्यात आले आहेत. दैनंदिन प्रवाशांची गर्दी असणाऱ्या गाडीत पूर्वीच्या तुलनेत अरुंद दरवाजे असल्याने गाडीच्या थांब्याच्या वेळेत प्रवाशांना चढणे- उतरणे गैरसोयीचे ठरत असल्याचे निदर्शनास आले आहे.