कारवाई करण्यात वन अधिकाऱ्यांची टाळाटाळ

डहाणू: मनोर वन परिक्षेत्र कक्षेत नांदगाव येथील सर्वे नं. ७१ या वन विभागाच्या २०० एकरच्या भुखंडावर मोठय़ा प्रमाणात अतिक्रमणे उभी राहत असताना वन विभाग कारवाईस टाळाटाळ करीत आहे. याबाबत वनाधिकारी तुषार काळभोर यांना विचारले असता येत्या काही दिवसात कारवाई करण्यात येईल असे सांगून त्यांनी वेळ मारून नेली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पालघर जिल्ह्य़ातील खानीवडे, वरई, हालोली, बोट, दुर्वेस, टेण, टाकवहाल, नांदगाव, आंवढाणी, चिल्हार, वाडा खडकोना, मेंढवण, सोमटा, चिंचपाडा, तवा, घोळ, चारोटी, महालक्ष्मी, धुंदलवाडी, तलासरी ते आच्छाडपर्यंत आदिवासी नवीन शर्तीच्या जमीनीत बेकायदा भराव करून धाबे चालू केले आहेत.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर धाब्यासाठी जागा नसल्याने धाबेमालकांनी आदिवासींचा सातबारा दाखवून वनविभागाच्या जागेत बेकायदा भराव आणि सपाटीकरण करून धाबे बांधले आहेत. नांदगाव येथे सर्वे नं. ७१ च्या वन विभागाच्या जागेवर अतिक्रमण असल्याचे मान्य करूनही अधिकारी कारवाई करत नसल्याने नागरिकांत आश्चर्य व्यक्त होत आहे.

मुंबई-अहमदाबाद महामार्गाचे सहा पदरीकरण झाले आहे. त्याच्या बाजूला सेवा रस्ता सोडून राष्ट्रीय महामार्गाची मर्यादा रेषा आहे. मात्र धाबे मालकांनी सेवा रस्त्यावर माती भराव व काँक्रीटीकरण केले आहे, तर अनेक ठिकाणी वाहनांना जाण्या-येण्यसाठी महामार्गाचे दुभाजक तोडून बेकायदेशीर रहदारीचे मार्ग तयार केले आहेत. त्यामुळे महामार्गावरील अपघाताच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी याकडे डोळेझाक करीत आहेत. त्यामुळे वाहतूकदारांच्या जीवाशी खेळ सुरू आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मार्गात केलेल्या अतिक्रमणाचा अहवाल वरिष्ठांना पाठवण्यात आला आहे.

प्रवीण भिंगारे, अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

नांदगाव येथील अतिक्रमणावर येत्या दिवसात जेसीबी लावून अतिक्रमण दूर करण्यात येईल. त्याचा अहवाल आपल्याला दिला जाईल.

तुषार काळभोर, वन परिक्षेत्र अधिकारी, मनोर