पालघर: पालघर जिल्ह्यात लसीचा तुटवडा असल्याने लस मिळवण्यासाठी १२ ते १४ तास रांगेत उभे राहण्याची पाळी नागरिकांना ओढवली आहे. शहरी भागातील किंवा तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी लसीकरण होत असून ग्रामीण भागातील गरीब व गरजू नागरिकांना लस मिळावी यासाठी सामाजिक संस्था पुढे आल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘रोटरी क्लब आस बॉम्बे’ आणि ‘प्रिन्स अली आगाखान रुग्णालय’ यांच्यामार्फत मनोर व वाडा या ग्रामीण भागातील नागरिकांसाठी १००० ‘कोविशिल्ड’ लस उपलब्ध करण्यात आले असून जे नागरिक रांगेत उभे राहू शकत नाहीत किंवा सशुल्क खाजगी केंद्रांमध्ये लस घेऊ शकत नाही असा नागरिकांसाठी रोटरी क्लबतर्फे पालघर तालुक्याच्या ग्रामीण भागात लसीकरण करण्यात येणार आहे.

डॉ. एम. एस ढवळे ट्रस्टच्या भोपोली येथील ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना लस घेण्यासाठी किमान १० ते १५ किलोमीटर अंतरावर जावे लागत असे. ही बाब ढवळे ट्रस्टने लस उत्पादन करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूट दर्शनास आणून दिल्यानंतर सिरम इन्स्टिट्यूटने भोपोली परिसरातील नागरिकांसाठी एक हजार लसीचा विनामूल्य साठा ढवळे ट्रस्टला दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून व आठवडा अखेरीस जिल्ह्यातील लसीचा पुरवठा संपुष्टात आला होता. रविवारी रात्री उपलब्ध झालेल्या लसीमधून जिल्ह्यात ग्रामीण भागातील महिलांसाठी ४८ ठिकाणी कोविशिल्ड व चार ठिकाणी ‘कोवॅक्सिन’ लसीकरण राबवले गेले.