नीरज राऊत

पालघर: केंद्र सरकारच्या बौद्धिक संपदा विभागाने २९ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या भौगोलिक उपदर्शन पत्रिकेमध्ये देशातून प्राप्त झालेल्या ५० अर्जांना मान्यता देऊन भौगोलिक मानांकन देण्याचे निश्चित केले आहे. यामध्ये पालघर जिल्ह्यातील बहाडोली तसेच ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील जांभूळ या फळाला भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे. यासह राज्यातील एकंदर नऊ वस्तूंना तसेच कला व संस्कृतीशी संबंधित चार अर्जांना मान्यता देण्यात आली असून त्यामध्ये पेण येथील गणेश मूर्तींचा समावेश आहे.

maharashtra govt introduces new guidelines for school picnic
शैक्षणिक सहलींसाठी शिक्षणाधिकाऱ्यांकडून दक्षतेची सूचना
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
education board warning against schools for obstructing students while filling exam application zws
परीक्षा अर्ज भरताना अडवणूक केल्यास शाळांवर कारवाई;  शिक्षण मंडळाचा इशारा
Local fishermen save life of couple stuck in rough sea in ratnagiri
दाम्पत्याला भाट्ये समुद्रात खेळणे पडले महागात; स्थानिक मच्छीमारांनी वाचविले प्राण
Sanjay Malhotra loksatta article
अन्वयार्थ : कपातपर्वाचा पायरव?
Target of purchasing 33 lakh quintals of paddy in tribal areas
आदिवासी क्षेत्रात ३३ लाख क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट
Chief Minister Ladki Bahin Yojana received great response from Pimpri Chinchwad city
पिंपरीत सर्वाधिक लाडक्या बहिणीचे अर्ज बाद
3 percent errors possible in ladki bahin yojana application scrutiny
लाडकी बहीण योजनेच्या अर्ज छाननीत तीन टक्के त्रुटींचा संभव;  नाशिक विभागातील स्थिती

देशभरातील विविध संस्था, उत्पादक संघ, शेतकरी गट, कल्याणकारी मंडळ, संवर्धन संघ आदींनी भौगोलिक मानांकनासाठी अर्ज केले होते. या अर्जांवर देशभरात विविध ठिकाणी सुनावणी होऊन २९ नोव्हेंबर रोजी प्रकाशित झालेल्या भौगोलिक उपदर्शन प्रक्रियेत केंद्र सरकारने मान्य केलेल्या भौगोलिक मानांकना अर्जाचा तपशिल प्रसिद्ध केली आहे. या यादीत राज्यातील १३ अर्जांना मान्यता मिळाली असून ग्रामीण संस्कृती तसेच ग्रामीण भागातील संबंधित राज्यातील अनेक वस्तूंना भौगोलिक मानांकन प्राप्त झाल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा… पालघर : कालव्यांच्या दुरवस्थेमुळे सूर्या प्रकल्पाच्या सिंचनक्षेत्रात सातत्याने घट, आधुनिक सिंचन प्रणालीकडे दुर्लक्ष

२४ मे २०२२ रोजी अर्ज करणाऱ्या बदलापूर येथील जांभूळ परिसंवर्धन आणि समुदाय विकास चॅरिटेबल ट्रस्ट तसेच २९ ऑगस्ट २०२२ रोजी बहाडोली येथील बहाडोली जांभूळ उत्पादक शेतकरी गट यांचे अर्ज मान्य करण्यात आले असून जांभळाच्या दोन्ही ठिकाणी असलेली वेगवेगळी ऐतिहासिक व भौगोलिक पार्श्वभूमी व वैशिष्ट्ये विचाराधीन घेऊन त्यांना स्वतंत्रपणे मानांकन देण्यात आले आहे.

याच बरोबरीने नंदुरबार येथील आमचूर, नंदुरबार येथील मिरची, पानचिंचोळी (लातूर) येथील चिंच, बोरसुरी (लातूर) येथील तुर डाळ, कस्ती (लातूर) येथील कोथिंबीर, बदनापूर जालना येथील दगडी ज्वारी, उदगीर (लातूर) येथील कुंठाळगिरी खवा यांना भौगोलिक मानांकन देण्यात आले आहे. तसेच पेण येथील गणेश मूर्ती, सावंतवाडी येथील लाकडी हस्तकला व मिरज येथील तानपुरा यांना देखील भौगोलिक मानांकन देण्यात आले आहे.

हेही वाचा… ‘जेएनपीए’ची माहिती फसवी, संघर्ष समितीचा आरोप; प्रदूषण नियंत्रण विभागाच्या कारवाईकडे जनतेचे लक्ष

बहाडोली जांभळाची भौगोलिक मानांकनकडे वाटचाल

अनेक दशकांपासून प्रसिद्ध असणाऱ्या बहाडोली येथील जांभळांना भौगोलिक मानांकन मिळावे यासाठी सन 2018 पासून प्रयत्न सुरू झाले. मोठा आकार, मांसाळ व रसाळ व लहान आकाराची बी असणाऱ्या या फळाला भौगोलिक मानांकन मिळावे या दृष्टिकोनातून बहाडोली जांभूळ उत्पादक शेतकरी गट स्थापन करून या जांभळाशी संबंधित ऐतिहासिक तसेच भौगोलिक पुरावे गोळा करण्यासाठी जगदीश पाटील यांच्या समन्वयाने प्रयत्न सुरू केले. या फळाचे रासायनिक विश्लेषण खाजगी प्रयोगशाळेतून करणे खर्चीक असल्याने कृषी विभागाने केलेल्या रासायनिक विश्लेषणाचा आधार घेण्यात आला. सूर्या व वैतरणा या दोन नद्यांच्या संगमावर वसलेल्या या गावात गाळाची जमीन असल्याने येथील फळाला असणारे विशिष्ट चव व औषधी गुण यांचा अभ्यास करत कृषी विभागातील अधिकाऱ्यांची मदत घेऊन भौगोलिक मानांकन मिळण्यासाठी प्रस्ताव खाजगी तज्ञ सल्लागारांच्या माध्यमातून सादर करण्यात आला. त्याबाबत मुंबई येथे सुनावणी झाल्यानंतर बहाडोली येथील जांभळाला भौगोलिक मानांकन देण्यात आले.

भौगोलिक मानांकन मिळालेल्या राज्यातील विविध अर्जांमध्ये पहिल्यांदाच ग्रामीण भागातील पदार्थांना तसेच ग्रामीण संस्कृतीची निगडित वस्तूंना भौगोलिक मानांक प्रप्त झाले आहे. अनेक ठिकाणी पुराणकाळातील ज्या वस्तूंचे महत्त्व होते, ते वृक्षतोड झाल्यामुळे किंवा शहरीकरण झाल्याने याची उपलब्धता कमी झाली होती. जांभूळ, चिंच, डाळ, कोथिंबीर सारख्या पदार्थांना भौगोलिक मानांकन मिळाल्याबद्दल समाधान वाटत आहे – गणेश हिंगमिरे, भौगोलिक मानांकन, तज्ञ व सल्लागार

Story img Loader