पालघर : मंगळवारी सायंकाळी पालघर रेल्वे यार्डात मालगाडी घसरल्याने गुजरात कडून मुंबईकडे येणाऱ्या मार्गिकेवरील वाहतूक ठप्प झाली आहे. घसरलेल्या मालवाहू डब्यांना सरकविण्याचे काम तसेच नव्याने स्लीपर अंथरून त्यावर रेल्वे रूळ उभारण्यासाठी काम सुरू आहे. त्याचबरोबर वाकलेला विद्युत वाहिनीचा खांब बदलण्याचे काम हाती घेण्यात आले असून विभागीय रेल्वे अधिकारी (डीआरएम) नीरज वर्मा यांच्या सह वरिष्ठ रेल्वे अधिकारी यांच्या देखरेखीखाली ५०० पेक्षा अधिक मनुष्यबळाच्या मदतीने काम सुरू आहे.
घसलेला एक डबा बाजूला सरकविणे व विद्युत प्रणाली पूर्ववत केल्यानंतर चाचणी घेल्यानंतर मुंबई कडे जाणारी मार्गिका खुली करण्यात येणार आहे. यासाठी सायंकाळ उजडेल अशी शक्यता असून रेल्वे सेवा लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे नीरज वर्मा यांनी सांगितले.
हेही वाचा…यंत्रणेच्या तयारीअभावी मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कोंडी
दरम्यान बोईसर ते केळवा रोड दरम्यानच्या मार्गीके वरून दोन्ही दिशेच्या लांब पल्ल्याच्या गाड्या आलटून पालटून सोडण्यात येत असून या गाड्यांना डहाणू ते विरार दरम्यान सर्व स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. हा अपघात घडल्यापासून विरार ते डहाणू रोड पर्यंतची उपनगरी सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे.