कासा: पालघर जिल्ह्यात गेल्या आठ ते दहा दिवसापासून जोरदार मुसळधार पाऊस सुरू आहे . तसेच आज धामणी धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस झाल्यामुळे धामणी धरण हे पूर्णपणे भरले आहे . त्यामुळे धरणाचे पाच दरवाजे दीड मीटरने उघडून नदीमध्ये पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे धामणी धरणातून २७५०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
हेही वाचा >>> वंदे भारतला गुरांची धडक; गाडीचे नुकसान नाही
धामणी धरणाचे पाचही दरवाजे उघडले असल्यामुळे सूर्या नदीला खूप मोठा पूर आला आहे . तसेच धामणी धरणाखाली असलेले कवडास धरण ही ओसंडून वाहत आहे. कवडास धरणातून ६८५१० क्यूसेक पाण्याचा विसर्ग नदी पात्रात होत आहे. त्यामुळे प्रशासनाने नदी परिसरात येणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा >>> ग्रीन डिझेल पंपाचे अमिष दाखवून वाड्यातील एका तरुणाची ३० लाख ८० हजार रुपयांची फसवणूक
२७ जुलै धरण क्षेत्रात २२८ मी.मी. पर्यत पाउस झाला असून एक जुन पासुन आजपर्यंत २६३१मी. मी पाउस झाला आहे. या पूर्वी १४ जुलै लाच धामणी धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. सूर्या नदी ला पुर आल्याने नदी काठच्या वेती, वरोती, वाघाडी, कासा, चारोटी, घोळ, पेठ, म्हसाड, नानिवली,आंबेदे या गावांना व आजूबाजूच्या पाड्यातील नागरिकांना सतर्क तेचा इशारा दिला आहे. नदीकिनाऱ्यावर शेतकाम किंवा मासे पकडण्यासाठी जाऊ नये. असे महसूल प्रशासनाने आवाहन केले आहे.