पालघर: Maharashtra Weather Forecast हवामान विभागाने शनिवारी जिल्ह्याला  अतिवृष्टीचा (रेड अलर्ट) इशारा दिला आहे. असे असले तरी  गुरुवार आणि  शुक्रवारी पावसाचा जोर ओसरलेला दिसला. पालघर व डहाणू तालुक्यात काही काळ सूर्यप्रकाश दिसून आला.  जिल्ह्यात दिवसभरात मध्यम ते जोराच्या सरी अधूनमधून सुरू असून गुरुवारी वसई, पालघर व वाडा येथे अतिवृष्टी नोंदवण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुधवारी दिवसभर कोसळलेल्या  पावसाने रात्री काही प्रमाणात विश्रांती घेतली.  गुरुवारीदेखील अधूनमधून जोराच्या सरी वगळता दिवसभर पावसाची उघडीप होती. आज डहाणूपासून बोईसपर्यंत दुपापर्यंत विशेष पाऊस झाला नाही. वेधशाळेच्या सतर्कतेमुळे शाळा, महाविद्यालयांना सलग तीन दिवस सुट्टी मिळाली. डहाणू तालुक्यात विविध ठिकाणी खोलगट भागात साचलेले पाणी ओसरायला लागले आहे.  जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. अनेक रस्त्यांची खड्डेमय अवस्था झाली आहे.  वाहन चालवणे त्रासदायक होत आहे. महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा केला असून घर पडणे तसेच घरात पाणी शिरल्याने नुकसान झालेल्या ठिकाणी पंचनामे सुरू केले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनकडून देण्यात आली.

तालुकानिहाय पाऊस (मिलिमीटर)

  • वसई  १३६.००
  • जव्हार  ५७.६६
  • विक्रमगड  ३८.३०
  • मोखाडा २७.५५
  • वाडा  ८१.७५
  • डहाणू   २७.४०
  •   पालघर १००.३०
  • तलासरी ४४.००
  • सरासरी  ६४.१२