बोईसर : वाढवण बंदर रद्द करण्याच्या प्रमुख मागणी सह इतर अनेक मागण्यांसाठी आज मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील मनोर जवळील जव्हार फाटा येथे आदिवासी संघटनांच्या वतीने महामार्ग रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांनी जवळपास एक तास महामार्ग रोखून धरल्याने दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या.

या आंदोलनात आदिवासी एकता परिषद व भुमिसेना या आदिवासी संघटनांचे जवळपास एक हजार कार्यकर्ते सहभागी झाले होते. केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देत मागण्या मान्य न झाल्यास रेल रोको आंदोलनाचा इशारा यावेळी भूमिसेनेचे संस्थापक अध्यक्ष काळूराम धोदडे यांनी दिला. या आंदोलनाला महविकास आघाडी मधील सर्व पक्षांनी पाठिंबा दिला होता.

Public Works Minister Ravindra Chavan confession that it will take two years for the Mumbai to Goa highway to be completed
मुंबई- गोवा महामार्ग पूर्ण होण्यास आणखी दोन वर्षे; सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांची कबुली
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
case against contractor for mumbai goa highway poor quality work
मुंबई-गोवा महामार्गाच्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल; अभियंता सुजित सदानंद कावळे यांना अटक
Nagpur, Bombay High Court, MSRDC, Nagpur Bench of Bombay High Court, Samruddhi mahamarg, vehicle inspections, Transport Department, Public Interest Litigation,
उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचा समृद्धी महामार्गावरून प्रवास, अधिकाऱ्यांच्या दाव्याची पोलखोल….
Busy roads in Dombivli are closed for traffic on Krishna Ashtami
कृष्ण अष्टमीच्या दिवशी डोंबिवलीतील वर्दळीचे रस्ते वाहतुकीसाठी बंद
Nashik, Change traffic route Nashik,
नाशिक : लाडकी बहीण मेळाव्यामुळे आज वाहतूक मार्गात बदल
msrdc to change in alignment of shaktipeeth expressway
शक्तिपीठ महामार्गाच्या संरेखनात बदल; एमएसआरडीसीकडून पर्यावरण परवानगीचा प्रस्ताव मागे
Human chain protest, national highway,
वसईत राष्ट्रीय महामार्गावर मानवी साखळी आंदोलन, रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याने संताप

हेही वाचा >>> पालघरमधील ग्रामपंचायत निवडणुकीत दिग्गज नेत्यांची कसोटी

पालघर जिल्ह्यातील महाकाय वाढवण बंदराला डहाणू तालुका संरक्षण प्राधिकरणाने ना हरकत दाखला दिल्यामुळे  जिल्ह्यातील मच्छीमार, शेतकरी, बागायतदार  यांच्यामध्ये सरकारविरोधात प्रचंड आक्रोश व्यक्त केला जात आहे. वाढवण बंदराविरोधात जिल्ह्यातील वातावरण अधिकच तापू लागले असून विरोधात ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहेत. आदिवासी एकता परिषद व भूमी सेना या संघटनांच्या वतीने मनोर जवळील जव्हार फाटा येथे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग जवळपास एक तास रोखून धरण्यात आला.

हेही वाचा >>> महालक्ष्मी मंदिरातून ज्योत घेऊन जाण्यासाठी देविभक्तांची रीघ

कडाकाच्या उन्हात हजारभर महीला पुरुष कार्यकर्त्यांनी महामार्गावर बसकन मारत केंद्र आणि राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या आंदोलनात खासदार राजेंद्र गावित सहभागी होऊन त्यांनी बंदर विरोधी भूमीकेला पाठिंबा दर्शवला. लोकप्रतिनिधींना निवेदन देणार असल्याचे सांगितल्याने मोर्चेकरांची भेट घेण्यासाठी व त्यांची भूमिका समजून घेण्यासाठी आपण गेल्याचा खुलासा खासदार राजेंद्र गावित यांनी केला आहे.

आंदोलकांच्या प्रमुख मागण्या :

• वाढवण बंदर कायमचे रद्द करा.

• धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण देऊ नये.

• राज्य सरकारने कंत्राटी भारतीय संदर्भात काढलेला शासन निर्णय रद्द करण्यात यावा.

• सरकारी शाळांचे खाजगीकरण बंद करावे.

• मनोर येथील ट्रॉमा केअर रुग्णालयाचे काम लवकर पूर्ण करण्यात यावे.

• मनोर- जव्हार फाटा येथील उड्डाणपुलाचे काम लवकर सुरू करावे.

• पेसा भरतीची संपूर्ण अंमलबजावणी करावी.