स्तनदा मातांसाठी जिल्ह्य़ात ६७ ठिकाणी उपक्रम;  शासकीय कार्यालयांसह सार्वजनिक ठिकाणी कक्षांची मागणी

पालघर: बाळांच्या स्तनपानासाठी जिल्ह्यातील काही सार्वजनिक ठिकाणी हिरकणी कक्ष उभारण्यात आल्याने हिरकणी कक्ष मातांसाठी वरदान ठरत आहेत. जिल्ह्यातील विविध सार्वजनिक ठिकाणी ६७ हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. काही ठिकाणी ते उभारले नसल्याने त्यांची कुचंबणा होत आहे त्यामुळे तशी उभारणी व्हावी म्हणून मागणी जोर धरत आहे.

दूध पिणारे तान्हेबाळ असणाऱ्या महिलांना प्रवास करायचा असल्यास सार्वजनिक ठिकाणी स्तनपान करण्यास अडचणी येतात. अशावेळी बालके आईच्या दुधापासून वंचित राहतात. अशा अडचणीच्या वेळी मातेला एखाद्या आडोशाला स्तनपान द्यावे लागते. हा मुद्दा अनेक वर्षे सरकारदरबारी पटलावर राहिल्यानंतर अखेर स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Nashik compensation land, Farmers Action Committee Nashik,
नाशिक : जागेचा मोबदला न मिळाल्यास रस्त्यांवर नांगर – मनपा आयुक्तांना शेतकरी कृती समितीचा इशारा
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
Police patrol J J Hospital, Mumbai,
मुंबई : डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी जे.जे. रुग्णालयात पोलीस घालणार गस्त
GSB Ganesh utsav, Insurance Cover GSB
‘जीएसबी’च्या गणेशोत्सवासाठी ४००.५८ कोटींचे विमा संरक्षण
MHADA, Mumbai, mhada house prices in Mumbai, expensive mhada house, house prices, 2030 house lot, expensive houses,
‘एलआयजी’तील घर अडीच कोटींचे! दुरूस्ती मंडळाकडून सोडतीसाठी मिळणाऱ्या घरांच्या विक्रीचा म्हाडासमोर पेच
potholes roads Mumbai, Mumbai,
मुंबईतील रस्त्यावर आतापर्यंत १६ हजार खड्डे बुजवले, गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवण्यासाठी पालिकेची यंत्रणा युद्धपातळीवर कामाला
nmmc providing clean pure water to navi mumbaikars test 2000 water samples
नवी मुंबईकरांना स्वच्छ, शुद्ध पाणीपुरवठा; पाण्याच्या दोन हजार नमुन्यांच्या तपासणीतून स्पष्ट
Traffic congestion at different place in Nashik city
नाशिक : शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी

त्यानुसार पालघर जिल्ह्यात दोन वर्षांपूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, एसटी डेपो, रेल्वे स्थानक आदी ठिकाणी हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आले. या कक्षांचा वापरही होत आहे. मात्र काही शासकीय कार्यालयांसह सार्वजनिक ठिकाणी असे कक्ष स्थापन केले नसल्याने मातांना स्तनपानासाठी एखादी जागा शोधावी लागते. मात्र बाळांना दूध पाजण्यासाठी ती जागाही असुरक्षित आहे.

पालघर जिल्ह्यात जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या बारा ग्रामीण रुग्णालयांपैकी दहा ठिकाणी हिरकणी कक्ष सुरू आहेत. पालघर येथे करोना केंद्र उभारल्याने तर बोईसर येथील ग्रामीण रुग्णालयाची इमारत जीर्ण झाल्यामुळे तिथे हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आलेले नाहीत. जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय अंतर्गत ४६ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी हिरकणी कक्ष असून त्याचा वापर तिथे येणाऱ्या महिलांकडून होत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी यांनी सांगितले.

पालघर, बोईसर, डहाणू या मेल एक्सप्रेस थांबणाऱ्या रेल्वे स्थानकांवर रेल्वे प्रशासनाने हिरकणी कक्ष उभारण्यात आले आहेत. लांब पल्लय़ाच्या प्रवासासाठी जाणाऱ्या महिला या कक्षाचा वापर करत असल्याची माहिती पालघर स्थानकावरील एका कर्मचाऱ्याने दिली. राज्य परिवहन विभागाच्या पालघर विभागात आठ बस डेपो असून सहा डेपोंमध्ये हिरकणी कक्ष उभारण्यात आले आहेत.

शासन निर्णयानुसार प्रत्येक जिल्ह्यातील सार्वजनिक व रहदारीच्या ठिकाणी, महत्त्वाची शासकीय कार्यालये, पोलीस स्थानके, जिल्हा परिषद, पंचायत समिती कार्यालये आदी ठिकाणी हिरकणी कक्ष स्थापन करणे आवश्यक आहे. मात्र पालघर जिल्ह्यात काही शासकीय कार्यालयांमध्ये हिरकणी कक्ष स्थापन झालेली नाहीत.

स्तनपान करताना महिलांना वाटणारी असुरक्षितता व कुचंबना या हिरकणी कक्षामुळे दूर झाली आहे. सरकारने स्तनदा मातांसाठी कक्षांचा चांगला पर्याय उपलब्ध केल्याने मातांसाठी ते वरदान आहेत.

– डॉ स्मिता शिंदे, पालघर