पालघर: काळ्या यादी टाकलेल्या ठेकेदाराला पालघर नगर परिषदेच्या मालमत्ता पुनर्मूल्यांकनाचा व घरपट्टी आकारणीबाबतचा बेकायदा ठेका दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे ठेक्याचे लेखा परीक्षणाची मागणी नगरपरिषदेच्या नगरसेवकांमार्फत करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांंपासून पालघर नगर परिषदेमध्ये मालमत्ताचे पुनर्मूल्यांकन झालेले नव्हते. त्यामुळे अनेक वेळा हा विषय सर्वसाधारण सभेत गाजला होता. त्यानंतर पालघर नगरपरिषदेने पुनर्मूल्यांकनाच्या कामासाठी एका संस्थेला नियुक्त करण्याचे निर्णय घेतला. त्यासाठी संस्था, ठेकेदारांकडून निविदा मागवण्यात आल्या.
मात्र एका ठेकेदाराने आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केलेली नसताना व नगरपरिषद प्रशासन व पदाधिकारी यांनी अपात्र असलेल्या या ठेकेदाराला पात्र ठरवून त्याला ठेका देण्याचे कटकारस्थान रचले आहे, असे विरोधी पक्षाच्या नगरसेवकांचे म्हणणे आहे. मालमत्ता पुनर्मूल्यांकनासाठी ज्या ठेकेदाराला ठेका देण्यात आला आहे, त्याला अमरावती महानगरपालिकेने काळा यादीत टाकले आहे. पालघर नगरपरिषदेने त्याला काम देताना या बाबीचा विचार केलेला दिसत नाही. तसेच या ठेकेदाराने ज्या ठिकाणी काम केल्याचे अनुभव दाखले जोडले आहेत. ते बरम्य़ाच आधीचे आहेत. या सर्व प्रकाराबाबत एका सभेमध्ये एका नगरसेविकेने आपली हरकतही नोंदवलेली आहे. त्याचे स्पष्टीकरण न देता ठेकेदाराला काम देण्यात आले आहे. या गैरप्रकाराची चौकशी करावी अशी मागणी पालघर नगर परिषदेच्या नगरसेवकाने स्थानिक निधी लेखा परीक्षण विभागाचे सहाय्यक संचालक यांच्याकडे केली आहे.
पुनर्मूल्यांकनाच्या ठेक्यांमध्ये गैरव्यवहार झाला आहे. ठेकेदारा मार्फत पुनर्मूल्यांकन करता वेळी भ्रष्टाचार होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे नगर परिषदेचे लेखापरीक्षण करून या बेकायदेशीर निविदा संबंधात स्थानिक निधी लेखापरीक्षण विभागाकडे न्याय मागितला आहे.
-अरुण माने, नगरसेवक, पालघर नगरपरिषद
तRार प्राप्त झाली असून नगरपरिषदेच्या प्रशासकीय मसुदा समितीला यामध्ये तांत्रिक व कायदेशीर बाबी तपासण्या करण्यास सांगितले आहे. त्यांचा अहवाल सादर झाल्यानंतरच पुढील कार्यवाही होणे अपेक्षित आहे.
-डॉ.उज्वला काळे, नगराध्यक्ष, पालघर नगरपरिषद.